दररोज सोडा पिण्याची सवय असेल तर लगेच सावध व्हा; का? ते जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। बहुतांशी लोकांना इतर कोणत्याही पेयापेक्षा सोडा पिणे सोयीस्कर आणि पसंतीचे वाटते. कित्येकजण तर जेवतानाही पाण्याऐवजी सोडा पितात. कारण, त्यात साखरेचे प्रमाण कमी असते. मात्र सोडासुद्धा इतर पेयांइतकाच शरीराला हानी पोहचवू शकतो हे खूप लोक जाणतात. यामुळे वेळीच सावध व्हा. सोड्यात आढळणारी रसायने शारीरिक आंतरक्रियांसाठी हानिकारक असू शकतात. शिवाय याचा वाईट परिणाम शरीरातील मेद वाढवण्यासोबतच, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीवर देखील होतो. सोडा शरीरासाठी कसा अपायकारक आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर लगेच जाणून घ्या. पुढीलप्रमाणे –
१) सोड्याच्या ३५० मिलीमध्ये ३९ ग्रॅम इतकी साखर असते. ही साखर शरीरातील जीवाणू आणि विषाणू वाढवण्याचे कार्य करते. यामुळे सोड्याच्या अतिसेवनामुळे शरीरातील खराब बॅक्टेरिया वाढतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वेगाने कमकुवत होते.
२) दररोज सोडा पिण्याच्या सवयीमुळे सुदृढ व्यक्तीलाही मधुमेह प्रकार २ होण्याची शक्यता बळावते. दररोज साखरयुक्त पेय पिण्याने शरीरातील इन्सुलिन वाढते. तसेच शरीरावर अनावश्यक चरबीचा साठा तयार होतो आणि मधुमेह प्रकार २ची समस्या होते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी सोड्याचे सेवन कमी करा.
३) शिवाय सोडा दररोज पिण्याच्या सवयीमुळे कोणत्याही आजाराचा सहज संसर्ग होतो. विशेषत: मधुमेह प्रकार २ झालेल्या रुग्णांना लवकर संक्रमण होते. शिवाय सोड्यातील साखरेमुळे शरीरातील रोगप्रतिकारक पांढऱ्या रक्त पेशी कमी होतात. ज्या संक्रमणास विरोध करण्यास मदत करतात. त्यांचे शरीरातील संतुलन कमी झाले असता मधुमेह प्रकार २च्या रुग्णांची इम्यून सिस्टीम कमकुवत होते. यामुळे त्यांनी सोड्याचे सेवन करू नये.
४) दररोज नित्य नियमाने सोडा पिण्याच्या सवयीमुळे शरीरात जळजळ निर्माण होते. याव्यतिरिक्त जीवघेणा आजारदेखील होण्याचा धोका वाढतो. अभ्यासानुसार जे लोक दररोज सोडा पीतात त्यांच्या शरीरात यूरिक आम्लाचे प्रमाण जास्त असते आणि यामुळे शरीराचा दाह वाढतो. यामुळे गर्मीच्या समस्यांना उभारी येते. जसे कि- त्वचा निघणे, तोंडाचे सालंपट जाणे, पायांना भेगा पडणे इ.
लक्षात ठेवा – सोडा फक्त कॅलरीज वाढवतो. याचा अर्थ त्यात कोणतेही शरीरास पौष्टिक असणारे घटक नाहीत. यामुळे वेळीच सोड्याचे सेवन कायमचे सोडा.