| |

(आ) घोळाणा फुटल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण (अ) भागात घोळाणा फुटणे म्हणजे काय? त्याची कारणे आणि लक्षणे कोणती? हि जाणून घेतली. यानंतर आपण (आ) भागात घोळाणा फुटल्यास सर्वसामान्यपणे घरातल्या घरात त्वरित कोणते उपचार करावे याबाबत जाणून घेणार आहेत.

सामान्यपणे घोळाणा फुटणे हि समस्या एकतर तीव्र उन्हाळ्याच्या दिवसात किंवा कडाक्याच्या थंडीमध्ये जाणवते. कारण याच दिवसांमध्ये नाकातील टिशूजचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वरवर हि समस्या फार सामान्य वाटते. पण असे असले तरीही यावर उपचार करणे अत्यावश्यक आहे. बहुतांशी उन्हात फिरणे, मसालेदार खाणे, नाकावर लागणे वा सर्दी झाल्याने ही समस्या उद्भवते. अशावेळी नाकातून रक्त येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. जसे कि, चक्कर येणे, डोके जड होणे, गरगरणे. तर परिस्थितीनुसार त्वरित जिथच्या जिथे काही उपाय करणे आवश्यक असते. अन्यथा नाकातील टिशूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. परिणामी गंध जाणण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नाकातून रक्त येऊ लागल्यास खालील घरगुती उपाय करा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) नाकातून रक्त येऊ लागल्यास तोंडाने श्वास घ्या.

२) नाकातून रक्ताची धार लागल्यास थंड पाण्याची धार डोक्यावर सोडा. त्वरित नाकातून रक्त येणे बंद होईल.

३) नाकातून रक्त येऊ लागल्यास एक बर्फाचा तुकडा कपड्यात गुंडाळून नाकावर ठेवा. यामुळे आराम मिळेल.

४) नाकातून अचानक रक्त आल्यास एखादा लहानसा कांदा कापून नाकाजवळ धरा. यामुळे फायदा होईल.

५) तुरटी पाण्यात उगाळून नाकावर लावल्यास नाकातून रक्त येण्याची समस्या दूर होईल.

६) उन्हाळ्याचा हंगाम असेल तर सफरचंदाच्या मुरांब्यांत वेलची घालून खा.

७) सर्दीच्या दिवसात बेलाची पाने पाण्यात उकळवून त्यात खडीसाखर वा बताशा घालून ते पाणी प्या.

 

० घरगुती उपचार –

१) अचानक नाकातून रक्त आल्यास थोडेसे डोके वरच्या बाजूला करा. जेणेकरून रक्त परत नाकात जाईल. यानंतर दोन्ही हातानी नाक दाबून ठेवा. यासाठी रुमाल वा टिश्यूचा वापर करा. पुढे नाक,गाल आणि कपाळावर बर्फ लावा.

२) एक चमचा अँपल सादर व्हिनेगर किंवा पांढऱ्या व्हिनेगरमध्ये सुती कापडाचा बोळा भिजवून नाकपुडीवर १० मिनिटे लावून ठेवा. रक्त थांबेल.

३) १ चमचा कांद्याच्या रसात सुती कापडाचा बोळा भिजवून ३ ते ४ मिनिटे नाकपुडीवर लावून ठेवा. असे केल्यास रक्त येणे थांबेल.

४) व्हिटॅमिन ई कॅप्सूल घरात उपलब्ध असल्यास यातील तेल नाकपुडीत त्वरित सोडा. यामुळेही आराम मिळेल.