| | | |

काय सांगता !!! तुमच्या आहारात आहेत ‘हे’ पदार्थ मग 100% होणार हृदयरोग अन् किडनी प्रॉब्लेम

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजच्या गतिमान जीवनात खूपदा अपरिहार्यतेपोटी लोकांना बाहेर खावं लागतं आणि नंतर त्याचा त्रासही होतो. म्हणूनच बाहेर खायची वेळ आली तर काय खाल्ल्यास त्रास होणार नाही हे आपल्याला माहीत असायला हवं. आजकाल शहरातील गतिमान जीवनामुळे सगळेचजण खूप बिझी झाले आहेत. नोकरी-धंद्यामुळे आजच्या माणसाला आपल्या जेवणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. रोजचा भरपूर प्रवास, खूप वेळ घराबाहेर राहणे यामुळे खूप वेळा बाहेर हॉटेलमध्ये जेवण हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य आणि अपरिहार्य भाग झाला आहे. रात्रीच्या पाटर्य़ा, वीकेंडचे ऑउटिंग, हॉटेलिंग ही आज खूप जणांची एक जीवनशैली झाली आहे. रेडिमेड फूड्स पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, जंक फूड खाणं हा प्रकार रोजचाच होत आहे. ही बदलती खाद्य संस्कृती नकळतपणे अनेक आजारांना साद देत आहे, आमंत्रण देत आहे.

एखाद्या लग्नामध्ये एखाद्या पार्टीमध्ये खूप उष्मांक असलेल्या (High Caloric Food) पदार्थाची रेलचेल असते. यात खूप तेलकट, खूप मसाल्याचे पदार्थ यांचा समावेश असतो. मिठाचापण अतिरेक असतो. आधी स्टार्टर, मग मुख्य जेवण, मग स्वीट, डेझर्ट्स, फळे हा भडिमार आपले पोट सहन करत असते. या अतिरेकी खाण्याचे रूपांतर मग चरबीत होते. वजन वाढते. पोट वाढते. आजार वाढतात.

त्यामुळे शक्यतो बाहेरचे खाऊ नये, पण जर नाइलाज असेल तर थोडा विचार करून आपल्या आवडीनुसार कमी तेलाचे, बिनतेलाचे, कमी उष्मांकाचे पदार्थ निवडावे. हॉटेलमध्येसुद्धा ऑर्डर देताना याचे भान ठेवावे. तळलेले पदार्थ खाऊ नये. त्यापेक्षा उकडलेले पदार्थ निवडावे. इडली-सांबार खाणे उत्तम.. पण खोबऱ्याची चटणी खाऊ नये. डोसा-उतप्पापण चालेल, पण तो कमीतकमी तेलात बनवायला सांगणे.

 

तंदूरवर भाजलेली रोटी किंवा इतर पदार्थ खाणे योग्य. मख्खन, लोणी, चीज असलेले पदार्थ नकोच. रोस्टेड, तंदुरी पदार्थ खाण्याचा आग्रह करा. नॉनव्हेजमध्ये तंदुरी चिकन, फिश खाऊ शकता. शेल असलेले फिश खाऊ नये, कारण त्यात खूप कोलेस्टेरॉल (व स्निग्ध पदार्थ) असते. वरण-भात, डाल-खिचडीवर तूप घेऊ नये. लोणची, तळलेले पापड, भजी शक्यतो खाणे टाळावे.

मांसाहारामध्ये लाल मांस, कलेजी खाऊ नये. तळलेले चिकन, फिश खाऊ नये. मिठाई टाळावी. केक, आइस्क्रीम, पेस्ट्री, सरबते, शीतपेये हे वज्र्य करावे.

हे सर्व बघितल्यावर आपण आपल्या जिभेच- पोटाचे चोचले पुरवायचे की आपल्या हृदयाची काळजी घ्यायची हे आपणच ठरवावे.

मीठ, पाणी, आहार :

पाणी आणि मीठ हे आपल्या आहाराचे एक अविभाज्य घटक आहेत. दोघांचाही अतिरेक हा घातकच हृदयविकार असणाऱ्यासाठी.

ज्यांना कोणताही आजार नाही, त्यांनी पाणी भरपूर पिण्यास हरकत नाही. पण ज्यांना हृदयाचा विकार, लिव्हरचा विकार, मूत्रपिंडाचा आजार किंवा फुप्फुसाचे आजार असतील त्यांनी पाण्याचे प्रमाण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ठरवावे. मीठ हे चवीच्या दृष्टीने आहारातील महत्त्वाचा घटक आहे. साधारणपणे मनुष्याला दिवसभरात २.५ ग्रॅम ते ३ ग्रॅम मिठाची गरज असते. पण भारतीय आहरात मिठाचा फार अतिरेक होतो. सर्वसाधारणपणे भारतीयांच्या आहारात १३ ते १८ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ असते. स्वयंपाक करताना जे मीठ वापरतो, त्याव्यतिरिक्त लोणची, पापड, खारे दाणे, वेफर्स, शेव- चिवडा, इत्यादी तत्सम पदार्थामध्ये भरपूर मीठ असते. त्यामुळे आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांना हृदयविकार, यकृत किंवा मूत्रपिंडविकार आहेत त्यांनी तर ३ ग्रॅमपेक्षाही कमी मीठ खावे.

आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. पेशींच्या आत आणि पेशींच्या बाहेर मिळून ४५ ते ५० लिटपर्यंत पाणी असते. शरीरातील ही द्रव्ये, पाणी, रक्त यांचं योग्य ते प्रमाण ठेवण्याचे कार्य हृदय, यकृत, मूत्रपिंड यामार्फत प्रामुख्याने होत असते, सोबतच इतर अवयव जसे फुप्फुस, त्वचा, वेगवेगळी होर्मोन्स, विविध यंत्रणा, त्याचे अंतरस्राव या पण पाण्याचे शरीरातील संतुलन ठेवण्याचे काम करतात. या पाण्याच्या संतुलनात मीठ (सोडियम) चा फार महत्त्वाचा रोल असतो. सोडियममध्ये पाण्याला खेचून घेण्याचा गुणधर्म आहे. (Fluid Retention). मूत्रपिंडाद्वारे सोडियम व त्यासोबत पाणी कमी-अधिक प्रमाणात शरीराबाहेर  टाकले जाते. त्यामार्फत शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते.

 

ज्या वेळी हृदय, यकृत आणि मूत्रपिंड यांच्या कार्यात बिघाड निर्माण होतो तेव्हा पाण्याचा निचरा नीट होत नाही. मग पेशीबाहेर तिसऱ्या जागेत म्हणजेच थर्ड स्पेसमध्ये पाणी साचायला सुरुवात होते. रुग्णाचे वजन तीन-चार किलोने वाढते. अंगावर, पायांवर सूज दिसायला लागते.

हृदयरोगामध्ये रुग्णाला दम लागणे (म्हणजे फुप्फुसांमध्ये पाणी साचायला लागते) व पायांवर सूज येणे. ह्यसारखी लक्षणे दिसतात. मूत्रपिंडाच्या आजारात प्रथम तोंडावर व डोळ्याभोवती सूज दिसून येते, नंतर ती शरीरभर पसरते. यकृताच्या आजारात पोटात पाणी जमा होते, नंतर पायावर हातांवर सूज येते.

 

ज्या वेळेस हृदय, यकृत, मूत्रपिंड यांच्या विकारात शरीरात पाणी जमायला लागते, त्या वेळी आहारात मिठाचे (सोडियम) प्रमाण आणि पाणी पिण्याचे प्रमाण कमी करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच उच्च रक्तदाबात सोडियमचा वापर कमी केल्यास रक्तदाब नियंत्रणास राहण्यास मदत होते. आपण जे मीठ खातो त्याचे रासायनिक  स्वरूप आहे सोडियम क्लोराइड. आपल्या खाण्यात इतरही काही सोडियम सयुंगाचा वापर होतो. जसे खाण्याचा सोडा (सोडियम बायकाबरेनेट), अजिनोमोटो (मोनो सोडियम ग्लुकोनेट), सैंधव सोडियम सल्फाईड आणि सोडियम क्लोराइड या वेगवेगळ्या संयुगांचा वापर आपण आपल्या आहारात करतो. त्यातून शरीरातील सोडियम वाढते.

सर्वसमान्य मनुष्याने सॅलड्स, फळांवर मीठ भिरभिरू नये. जास्त मिठाचे प्रमाण असलेले पदार्थ खाऊ नये. कमी सोडियमयुक्त मीठ हल्ली बाजारात मिळते. त्यात पोटॅशियमची संयुगे असतात. अशा प्रकारे लो सोडियमचे मीठ वापरायला हरकत नाही.