मिठाचा असा वापर कराल तर त्वचेच्या समस्यांपासून मिळेल आराम; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। जेवणात मीठ नसेल तर जेवण अळणी आणि बेचव लागते. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने मिठाचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. परजन्तु जेवणाला चव आणणारं मीठ काही फक्त याच कामासाठी वापरले जात नाही. मीठाचे असे अनेक फायदे आहेत जे कदाचित तुम्हाला माहितही नसतील.
मीठ असा पदार्थ आहे ज्याचा वापर त्वचेच्या समस्या सोडविण्यासाठी केला जाऊ शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि अरे हे कसं शक्य आहे. तर या प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता असेल तर हा लेख तुम्हाला पूर्ण वाचावा लागेल. तर जाणून घ्या कि मिठाचा वापर कसा केल्याने त्याचा फायदा त्वचेच्या समस्या सोडविण्यासाठी होतो. खालीलप्रमाणे :-
१) मिठाचा वापर टोनरप्रमाणे करा.
– आपली त्वचा तेलकट असेल आणि यामुळे अन्य समस्यांना तोंड देणे आता त्रासाचे वाटू लागले असेल तर अश्या तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी मीठ हा अतिशय उत्तम पर्याय आहे. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात अगदी हलके चिमूटभर मीठ घाला. हे पाणी अख्ख्या दिवसात तुम्ही कापसाच्या बोळाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. हे मिश्रण एक उत्तम टोनर म्हणून काम करेल.
२) मिठाचा वापर स्क्रब म्हणून करा.
– उन्हामुळे तुमची स्किन टॅन झाली असेल तर तुमच्यासमोर निश्चितच हे टॅन कसे काढायचे असा एक मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. मुळात आपली स्कीन सूर्याच्या तेजामुळे टोन झाली असेल तर हे टोनिंग काढणे अतिशय कठीण जाते. पण यासाठी मीठ हा अतिशय सोप्पा आणि उत्तम उपाय आहे. यासाठी एक चमचा नारळाच्या तेलामध्ये मीठ व्यवस्थित मिसळा आणि हे मिश्रण स्क्रबप्रमाणे आपल्या त्वचेला लावा यामुले टॅनिंगने काळी पडलेली त्वचा अगदी सहजपणे निघून जाण्यास मदत होते.
३) मीठापासून फेस मास्क तयार करा.
– मीठाचा फेस मास्क आपल्या त्वचेवरील माती आणि मुरुमांच्या समस्यांवर प्रभावी आहे. हा फेस मास्क तयार करण्यासाठी तीन चमचे मध आणि एक चमचा मीठ घ्या. या दोन्ही पदार्थांना एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळा आणि ह्याची पेस्ट आपल्या चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी अशीच ठेवा यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवा.
४) कोरड्या त्वचेच्या समस्यांसाठी मिठाच्या पाण्याने अंघोळ करा.
– कोरड्या त्वचेमुळे अनेक त्रास संभवतात. यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठाचा वापर करावा. आपल्या आंघोळीच्या बादलीभर कोमट पाण्यात साधारण अर्धा कप मीठ घाला आणि त्याने अंघोळ करा. शिवाय तुम्ही बाथटपमध्येदेखील मीठ घालून त्यामध्ये १५ मिनिटं बसल्याने त्वचेला लाभ होतो. यामुळे कोरड्या आणि रुक्ष त्वचेमुले होणारे त्रास थांबतात आणि त्वचा तजेलदार दिसते.