आपल्या शरीरातील शीतपित्ताचे प्रमाण कमी करायचे असल्यास ‘हे’ करा उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आहारात चुकीच्या पदार्थांचा समावेश केल्याने आपल्याला पिताच्या समस्या या जास्त प्रमाणात निर्माण होतात. पित्त्ताच्या समस्या जर वाढत गेल्या तर मात्र आपल्याला डोकेदुखी वाढते. कधी कधी पित्तात्त कोणतेही पदार्थ न खाता सुद्धा आपल्याला मळमळ हि जाणवते. खूप थकवा आल्यासारखा जाणवतो . पित्तापासून दूर राहायचे असेल तर त्यासाठी आहारात योग्य पदार्थांबरोबर पाण्याचे सुद्धा प्रमाण हे योग्य असणे आवश्यक आहे . आपल्या शरीरात शीत पित्त वाढण्याची कारणे हि वेगवेगळी आहेत . त्यासाठीचे घरगुती पद्धतीचे उपाय काय आहेत , ते जाणून घेऊया ….
नेमके हे शीतपित्त कसे असते. याची माहिती हि अनेकांना नसतेच . पण आपल्याला पित्त झाले आहे हे आपल्या ठराविक प्रकारच्या लक्षणांनी लगेच जाणवायला सुरुवात होते . पण त्यालाच शीतपित्त असे म्हणतात ते माहिती नाही अश्या वेळेला त्याची लक्षणे कोणती ते माहिती असणे गरजेचे आहे. अनेकांना अंगावर पित्ताच्या गांधी उठण्याची, त्याठिकाणी खाज येण्याचा त्रास होत असतो. याला शीतपित्त असे म्हणतात. आपल्या शरीराला असलेली ऍलर्जी हे सुद्धा शरीरावर गांधी उठण्याचे प्रमुख कारण आहे . अनेक वेळा आपले शरीर काही विषारी पदार्थांच्या सहवासात आले तर मात्र पित्ताच्या समस्या या जास्त जाणवतात. आपल्या शरीरातून जर हिस्टामीन नावाचे द्रव्य स्रवत असेल तर त्यावेळी त्या द्रव्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरावर गांधी या जास्त उठतात. त्यामुळे शरीराला खाज सुटते आणि लालसर पणा हा जाणवायला सुरुवात होते . सतत खाजवावेसे वाटते हे सर्वात महत्वाचे लक्षण आहे .
शीतपित्ताचा त्रास हा एखाद्या पदार्थाच्या अॅलर्जीमुळे होत असतो. त्या पदार्थापासून दूर राहिल्यास निश्चितच हा त्रास होणार नाही. आपल्याला ज्या वस्तूंची किंवा पदार्थांची ऍलर्जी आहे . अश्या पदार्थांपासून दूर राहणे हे सर्वात महत्वाचे आहे . अनेकांना उष्णतेचा त्रास हा जास्त असेल तर त्यावेळी आपल्याला घामोळ्या किंवा शरीराला गांधी येतात. रुग्णास कधीकधी वांगी, फरसाण, तूरडाळ, हरभरा डाळीचे पदार्थ, मांसाहार, अंडी अथवा उष्ण व मसालेदार पदार्थ खाण्यात आल्यास याचा त्रास जाणवतो. त्यामुळे असे कोणते पदार्थ आहेत , त्याचा त्रास हा आपल्या शरीराला जास्त प्रमाणात जाणवू शकतो हे लक्षात घेऊन त्याच्यापासून दूर राहणे पसंत करा. ज्या पदार्थांची ऍलर्जी जास्त आहे , ते पदार्थ आहारात घेऊ नका. हाच त्याच्यावर प्रमुख उपाय आहे.