हिवाळ्यात आल्याचा रस शरीरासाठी आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून उष्णेतेची अतिशय गरज असते. अश्यावेळी आपण हलकी जरी थंडी लागली तरी सर्वात आधी आल्याचा चहा पिण्याचा विचार करते. वर्षानुवर्ष अनेक लोक प्रत्येक ऋतूमध्ये आल्याचा चहा आवडीने पीत आहेत. मात्र थंडीत आल्याचं महत्व थोडंसं जास्त असत. हेच थोडं जास्त असं महत्व आज आम्ही तुम्हाला समजेल अश्या सोप्प्या भाषेत सांगणार आहोत. यामुळे थंडीमध्ये तुम्ही आल्याचे सेवन अक्राळ आणि आपल्या शरीराची आतून आणि बाहेरून योग्यरीत्या काळजी घेऊ शकाल. यासाठी सर्वप्रथम आपण आल्याचा रस तयार करायची कृती जाणून घेऊ आणि यानंतर शरीरोपयोगी फायदे.
० साहित्य – भरपूर प्रमाणात आले, थोडासा लिंबाचा रस, चवीपुरती साखर वा मध
० कृती – एक कप पाण्यासाठी अर्धा इंच आले या प्रमाणात आले घेऊन ते स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याची साल पूर्णपणे काढून किसून घ्या.(जेवढे कप आल्याचा रस त्याच्या दुप्पट पाणी घ्या) गॅसवर एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात किसलेले आले मिसळा. आता पाणी निम्मे होईपर्यंत उकळू द्या. आले या पाण्यामध्ये पुर्णपणे मिसळू द्या. यानंतर उकळलेले पाणी गाळून त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार साखर वा मध मिसळा. तुमचा आल्याचा आरोग्यदायी रस तयार.
० सेवन – या रसाचे सेवन गरम असतानाच करा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी या रसाचे सेवन करणे थंडीच्या दिवसात गुणकारी आहे. तसेच आले घालून पाणी उकळवून घ्या आणि फ्रिजमध्ये स्टोअर करा. ऐन वेळी पुन्हा गरम करून त्यात लिंबाचा रस, मध आणि साखर मिसळून हवा तेवढा रस प्या. साधारण आठवडाभरासाठी हे पाणी तयार करून फ्रीजमध्ये ठेवता येईल.
० फायदे –
१) आल्यामध्ये भरपूर कॉपर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. यामुळे आपल्या शरीराला आवश्यक विटामिन एस, सी आणि ई भरपूर मिळते.
२) आल्याचा रस नियमित प्यायल्यास मेटाबोलिजम वाढते आणि रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होतो.
३) आले प्रकृतीने उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हा रस पिऊ नये. मात्र थंडीच्या दिवसात मात्र असा रस पयायल्याने शरीराला आतून उष्णता मिळते.
४) आल्याचा रस पिण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेह प्रकार २ होण्याचा धोका कमी होतो.
५) थंडीच्या दिवसात तहान लागत नाही. यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी आल्याचा रस पिण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
६) आल्याचा रस नियमित पिण्यामुळे थंडीच्या दिवसात होणारा सर्दी खोकला नियंत्रणात राहतो.
७) ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो अश्या प्रत्येकाने आल्याचा रस पिणे फायदेशीर ठरते.