गरम मसाल्याच्या साहाय्याने करा झटपट वजन कंट्रोल; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचं असेल तर फिटनेस अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण प्रकृती उत्तम असेल तर आयुष्य जगण्यात मजा आहे. अन्यथा आजारपणात जगणं मरण्याहून वाईट सजा आहे. तसेच निरोगी राहण्यासाठी आणि फिटनेस राखण्यासाठी आपला आपल्या वजनावर कंट्रोल असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण एकदा का वजन वाढले कि, ते कमी करताना नाकी नऊ येतात. मग काय? हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक जीम लावतात, योगा क्लास लावतात. पण खर्च फक्त व्यायामाने वजन कमी होते? तर मित्रांनो असं नाही आहे. कारण यासाठी तुमचा आहारदेखील पोषक आणि पूरक असायला हवा. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करून तुम्ही थकला असाल तर आहारात या गरम मसाल्यांचा समावेश करा. कारण हे मसाले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-
० भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेको प्रकारचे मसाले आहारात वापरले जातात. अगदी लाल मिरचीपासून बनवलेली तिखा लाल ते इतर अनेक मसाले. काह मसाले विविध गरम मसाले कुटून देखील बनवले जातात. यातील काही निवडक मसाले एकत्र कुटले जातात त्याला गरम मसाला म्हणतात. यासाठी जाणून घ्या कोणते मसाले तुमचे वजन कमी करू शकतात. खालीलप्रमाणे:-
१) हळद – हळदीमध्ये अनेक गुणकारी घटक असतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये हळदीला विशेष महत्व आहे. शिवाय हळदीमुळे शरीराचा दाह कमी होतो. कारण हळदीमध्ये शरीराला डिटॉक्स करणारे गुणधर्म असतात. शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात हळदीचा वापर करणे फायदेशीर ठरते. यासाठी नियमित हळदीचे दूध पिणे फायदेशीर आहे.
२) जिरे – स्वयंपाक करताना फोडणीसाठी जिरे वापरणे जणू नियमच आहे. कारण काही पदार्थांमध्ये जिऱ्याशिवाय चवच येत नाही. मात्र चवीसाठी वापरले जाणारे जिरे वजन कमी करण्यासाठीदेखील फायदेशीर आहे हे फार कमी लोक जाणतात. जिऱ्यामुळे शरीरातील इन्सुलीन नियंत्रित राहते. त्यामुळे कोलेस्ट्ऱॉल वाढू नये यासाठी जिरे फायदेशीर आहे, म्हणून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जिऱ्याचे पाणी सकाळी उठल्यावर प्यावे.
३) काळीमिरी – काळीमिरी वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. कारण त्यामुळे मेटाबॉलिझम वाढते आणि आपोआपच वजन नियंत्रणात राहते. यासाठी स्वयंपाकात काळीमिरी कुटून टाका किंवा सकाळी कोमट पाण्यासोबत २ काळीमिरी चावून खा. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल.
४) बडीशेप – बडीशेपचा वापर मुखवास म्हणून करतातच पण याचा वापर वजन कमी करण्यासाठीही होतो. कारण बडीशेप खाल्ल्याने भुक नियंत्रणात राहते. यासाठी सकाळी उठल्यावर बडीशेप खा. शिवाय यातील व्हिटॅमिन्समुळे शरीराचे पोषण होते आणि खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. ज्यामुळे वजन जास्त वाढत नाही.
५) मेथी – मेथी दाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे घावणे, डोसे अशा पदार्थांमध्ये बॅटर तयार करताना ४-५ मेथी दाणे वापरले तर शरीराला पुरेसे फायबर मिळतात. इतकेच काय यासाठी तुम्ही मेथीचे लाडू खाऊ शकता. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहील आणि वजन कमी होईल. शिवाय शरीराला उष्णता आणि उर्जा दोन्ही मिळेल.