| |

थंडीतल्या हुडहुडीवर रम किंवा ब्रँडी पिणे फायदेशीर?; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या ऋतुचक्रानुसार हिवाळा सुरु आहे. आताचा काळ हा हिवाळ्याचा मध्यान्ह असल्यामुळे थंडीची मात्रा अधिक आहे. थंडीच्या दिवसात शरीराचे तापमान कमी होते आणि यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. म्हणून या दिवसांमध्ये आपल्या शरीराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. यासाठी आहारात काही विशेष बदल करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तर मित्र सल्ला देतात तो थोडी ब्रँडी वा रम पिण्याचा. काय तुमचेही मित्र तुम्हाला हाच सल्ला देतात? जर तुमचे उत्तर हो असेल तर हि माहिती तुमच्यासाठी गरजेची आहे.

मित्रांनो तज्ञ सांगतात कि, थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता येण्यासाठी ब्रँडी वा रम पिणे लाभदायी आहे. यामुळे शरीराला कोणतीही हानी होत नाही. मात्र कोणत्याही गोष्टीचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्याचे प्रमाण मर्यादित असेल. ते म्हणतात ना, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. हे काहीसे तसेच आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया हिवाळ्यात ब्रँडी आणि रम पिणे खरोखरच फायदेशीर आहे का?

 

० काय सांगतात तज्ञ?
– तज्ञ सांगतात, काही मर्यादित प्रमाणात ब्रँडी आणि रमचे सेवन हे थंडीच्या दिवसात लाभदायी ठरू शकते. कारण यामध्ये आपल्या शरीराला उष्णता देण्याची क्षमता असते ज्याचा आपल्याला लाभ होतो.

रिपोर्टनुसार, मोनाश युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले आहे कि, दररोज ३० मिलीलीटर ब्रँडी किंवा रमचे सेवन केल्याने थंडीमध्ये हे पेय औषधीप्रमाणे काम करेल. चला तर जाणून घेऊयात फायदे खालीलप्रमाणे:-

१) उबदार शरीर – गेली अनेक वर्ष लोक हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी रम आणि ब्रँडीचे सेवन करत आहेत. कधीकधी नवजात बाळाला मधात मिसळून ब्रँडी दिली जाते. ज्यामुळे त्याचे थंडीपासून संरक्षण होईल. संशोधकांच्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की रम आणि ब्रँडीच्या सेवनाने शरीर काही काळासाठी गरम होते ज्याचा आपल्याला थंडीमध्ये फायदा होतो.

२) सर्दी होईल दूर – हिवाळ्याच्या दिवसातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे सर्दी. हि सर्दी औषधांशिवायदेखील बरी होते. मात्र काही लोकांना संपूर्ण हिवाळा सर्दीचा त्रास होतो. अशावेळी ब्रँडी वा रमचे सेवन केल्यास आराम मिळतो. कारण या पेयांमध्ये अँटी माइक्रोबियल गुणधर्म असतात जे सामान्य सर्दीवर प्रभावी काम करतात.

३) निरोगी हृदय – डॉक्टर सांगतात हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हिवाळ्यात हृदयाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते आणि अशावेळी रम असेल किंवा ब्रँडी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे आम्ही नाही तर संशोधनांतून सिद्ध झालेले रिपोर्ट सांगतात. रिपोर्टनुसार, रम प्यायल्याने ब्लॉकेजचा धोका कमी होतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. शिवाय रक्त पातळ होते. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो.

४) श्वसनाच्या आजारांवर गुणकारी – थंडीमध्ये श्वसनाचे आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. यासाठी ब्रँडीचे सेवन उपयुक्त ठरते. कारण, ब्रँडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे श्वसनाच्या समस्यांपासून आराम देतात. असे संशोधनात सिद्ध झाले आहे कि, जे लोक दररोज ब्रँडीचे २ घोट पितात त्यांना फुफ्फुसाच्या आजाराचा धोका २०% कमी असतो.

५) हाड आणि स्नायूदुखीवर परिणामकारक – थंडीमध्ये संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिस या आजारांचे प्रमाण वाढते. यामुळे संपूर्ण शरीर वेदना सहन करत कण्हत राहते. अशा स्थितीत रम प्यायल्याने हाडांमधील खनिज वाढते आणि वेदना कमी होतात.

० अत्यंत महत्वाचे :-

– ब्रँडीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण ३५% ते ६०% च्या दरम्यान असते. जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँडीचे प्रकार म्हणजे ‘आर्माग्नॅक’ आणि ‘कॉग्नाक’. तर रममध्ये अल्कोहोलचे प्रमाण ३७.५% ते ८०% च्या दरम्यान असते. जगातील सर्वात लोकप्रिय रमचे प्रकार म्हणजे ‘रॉन झकापा’ ‘एल डोरॅडो’

– रम असो वा ब्रँडी कितीही गुणकारी असली तरीही प्रमाण मर्यादित असणे गरजेचे आहे. निश्चितच संशोधनांमध्ये सिद्ध झाल्याप्रमाणे ब्रँडी आणि रमचे सेवन हिवाळ्यात फायदेशीर आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की शारीरिक गरजेच्या नावावर तुम्ही जिभेची लालसा पूर्ण कराल आणि वाट्टेल तेवढे या पेयांचे सेवन कराल.

लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घटक असतो. रम आणि ब्रॅंडीचे अतिसेवन तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे या पेयांचे मर्यादित प्रमाणात सेवन केले तरच शरीरासाठी फायदेशीर आहे हे विसरू नका.