चक्कर आल्यावर नाकाला कांदा लावणे योग्य की अयोग्य?
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याला जर कधी चक्कर आली तर त्यावेळी आपली घरात असलेल्या वस्तूंपैकी आपल्या नाकाला कांदा लावून त्याचा वास हा आपल्या ला घ्यायला लावतात. काही ठिकाणी तर अश्या वेळी चप्पल लावली जाते पण साधारण हे घरगुती उपाय योग्य आहेत की अयोग्य ? त्याबद्धल जाणून घेऊया…
चक्कर येणे म्हणजे साधारण आपली मेंदूला काही प्रमाणात रक्तपुरवठा हा कमी होण्यास सुरुवात होते. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल च्या डॉक्टरांनी सांगितले की, आपला मेंदू इलेक्ट्रिक सर्किटचा बनलेला असतो. सगळी कामं या इलेक्ट्रिकल सर्किटच्या माध्यमातून होतात. या सर्किट बोर्डमध्ये एखाद्या वेळेस शॉट सर्किट झालं. तर, फीट येते.हात-पाय घट्ट होणं, डोळे पांढरे करणं, तोंडातून फेस येणं हे आकडी येण्याचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण जर आपल्याला चक्कर आली तर त्यावेळी कांदा हुंगणे किंवा चप्पल चा वास देने हे चुकीचे आहे. याचा संबंध हा कोणत्याच आजाराशी नाही.
एखाद्याला जर चक्कर आली तर त्यावेळी कांदा किंवा चपला लावल्या नाही गेल्या पाहिजेत. तसेच तोंडात चमचा वैगरे कोणत्याही वस्तू टाकू नयेत. तसेच आपल्या नाकात पाणी वगैरे हे अजिबात टाकू नये. कारण पाणी टाकल्याने नाकात पाणी ब्लॉक होते. त्यामुळे श्वासाचा त्रास हा जास्त प्रमाणात निर्माण होतो.