लिंबू आणि बेकिंग सोडा घेतल्याने कोरोना मरतो खरं आहे का ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आहारात लिंबू असणे गरजेचे आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा जास्त असते. कोरोनाला दूर करण्यासाठी आहारात कमी प्रमाणात लिंबू आणि सोडा असणे आवश्यक आहे , त्याने कोरोनाचे विषाणू मारतात. अशा प्रकारचा एक मेसेज वायरल होत आहे. पण हे खरंच तथ्य आहे का ? कारण कोरोनाच्या विषाणू पासून दूर राहण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हजारो प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. असे म्हंटले जाते आहे कि , लिंबू आणि सोडा याचे प्रमाण योग्य असेल तर त्याने कोरोनाचे विषाणू मरतात. संपूर्ण शरीरातील विषाणूंचा नायनाट होतो. एका इस्त्रायली तज्ज्ञाच्या नावे हा मेसेज व्हायरल होत आहे. गरम पाण्यात लिंबू आणि बेकिंग सोडा मिसळून दुपारच्या वेळी चहाप्रमाणे लोकांनी त्याचे सेवन करावे. हा कोरोनाचा एक अगदी सोपा उपचार आहे.
काय आहे यापाठीमागचे सत्य ?
कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याच्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर होता कामा नये. औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. तथापि, या संदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेजही व्हायरल होत आहेत. पण असे मेसेज पाहून आपले मनोबल वाढवण्यापेक्षा कोरोनाशी दोन हात करण्यासाठी फेस मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग प्रभावी संरक्षण असल्याचे म्हटले जाते. कोरोनासंदर्भात काही मार्गदर्शन तत्वे वापरली गेली पाहिजेत. कोरोना झाल्यावर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जे काही उपाय सांगितले गेले आहेत, त्या उपायांचा वापर करणे आवश्यक आहे. पण तुम्ही जर अशा चुकीच्या मेसेज वर भरोसा ठेवला तर मात्र तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
सरकारी माहिती एजन्सी पीआयबी अर्थात प्रेस इन्फर्मेशन ब्युरोची एक तथ्य तपासणी टीम असून, ती अशा अफवांचा खंडन करते. पीआयबी फॅक्टचेकनेही या संदेशात दिलेली माहिती ट्विट करून ती खोटी असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरस नाहीसा करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्यासह गरम पाण्याचे सेवन करण्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पूर्णपणे खोटा आहे. कोरो ना व्हायरसपासून लिंबू आणि बेकिंग सोडा संरक्षण प्रदान करू शकेल, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. कि कोणत्याही शास्त्रज्ञाने शोध लावला नाही.