सांधे दुखी आणि हाडांच्या दुखण्याला खूप महाग पडतील ‘या’ चुका
हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक जणांना उतारवयात आपल्या सांधेदुखी आणि हाडे दुखी याच्या समस्या जाणवायला सुरुवात होते. हाडे दुखी हि सर्वसामान्य पणे कोणत्याही वयात होऊ शकते , पण जर म्हातारपणात याच्या समस्या जाणवायला लागल्या तर मात्र यावर कोणत्या हि औषधांचा वापर हा केला जाऊ शकत नाही. अनेकवेळा डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा उपाय होत नाही . त्यामुळे सांधेदुखीच्या समस्या असतील तर मात्र आपल्याला या चुका करून चालणार नाहीत .
लठ्ठपणा ---
आपल्या शरीराचे वजन वाढेल तर आपल्या हालचालींना मर्यादा येतात. कोणतेही काम करायचे असेल तर मात्र आपल्याला त्रास हा सहन करावा लागतो. सांधेदुखी हि सुरुवातीला नॉर्मल वाटते पण त्याच्या दुखण्यामध्ये वाढ झाली तर मात्र ते आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. शरीराचे वजन वाढले तर आपल्या सांध्यांवर ताण यायला सुरुवात होते.
ध्रुमपान किंवा तंबाखू —
जर आपल्याला दररोज काही प्रमाणात ध्रुम्रपान करत असला किंवा तंबाखू खात असाल तर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवू लागतो. ध्रुमपानामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह हा योग्य रित्या सर्कुलेट होत नाही. सिगारेट आणि तांबाखू मध्ये निकोटीन चे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागात रक्त प्रवाह पोहचत नाही. रक्तप्रवाह प्रतिबंधित करण्याचे काम हे निकोटीन करते.
खांद्यावर ओझे —
खांद्यावर ओझे घेतल्याने सुद्धा आपल्या सांध्यांवर ताण यायला सुरुवात होते. खांद्यावर जर ताण आला तर तुम्हाला तुमच्या पायांची हाडे वगैरे दुखायला सुरुवात होते. जर आपल्या खांद्यावर काही प्रमाणात सतत ओझे असेल तर मात्र आपला खांदा दुखायला सुरुवात होते.
चपला —-
जर तुमच्या चपला या उंच टाचेच्या असतील तर त्यामुळे तुम्हाला पंज्याला आणि पायाला आधार हा मिळाला जात नाही. त्यामुळे गुडगा आणि पाय यांना चालताना त्रास होण्यास सुरुवात होते.
शरीर स्ट्रेच न करणे —
जर आपले शरीर स्ट्रेच झाले नाही तर मात्र आपल्याला आपल्या पायांच्या घोट्याना त्रास जाणवण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीर व्यवस्थित हवे असेल तर कमीत कमी काही काळ आपल्याला खांदयावर ओझे घेऊन न जाणे .