baniyan tree

प्राणवायू देणाऱ्या वटवृक्षाचे अफलातून फायदे जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन । खूप उंच  आणि विशाल असणाऱ्या  वटवृक्षाच्या सावलीचे महत्व हे उन्हाळयात चालत असणाऱ्या वाटसरूंना कळते. झाडे लावण्याचे आणि आपल्या आजूबाजूला झाडे असण्याचे महत्व हे आपल्याला ज्यावेळी आपल्यावर वाईट प्रसंग येतात त्यावेळीच लक्षात येतात. अनेक  ठिकाणावरून  तुम्ही ज्यावेळी रस्त्याने प्रवास करता. त्यावेळी तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही कडेला  वटवृक्षाची झाडे आढळून येतात. रस्त्याच्या कडेला लावलेली वटवृक्षाची झाडे हि आपल्याला खूप फायदेशीर असतात. कारण त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो. गाडी मधून निघणारे कार्बन मोनॉक्सइड शोषून घेण्याचे प्रमाण वडाच्या झाडांमध्ये जास्त असते. वडाचे झाड आणि मनुष्य यांच्यामध्ये  घनिष्ट संबंध आहेत. अजूनही भारतीय संस्कृतीत वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्षाला भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे.

baniyan tree

भारतीय संस्कृतीत वटवृक्षाला आध्यत्मिक दृष्टीने पहिले जाते. इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त प्राणवायू सोडणारा वृक्ष म्हणून वटवृक्षाला मानले जाते. कोणत्याच सजीव सृष्टीतील व्यक्तीचे, प्राण्यांचे आणि झाडाचे जीवन इतके मोठे नसते . किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जीवन हे एका वटवृक्षाचे आहे. प्रत्येक गावात एक ना एक वटवृक्ष असतो. त्याच्या पारंब्या या खूप लांबपर्यंत पसरलेल्या असतात. त्याच्यापासून मिळणारी सावली आणि त्याच्या फांद्यांपासून तयार केलेले औषध हे मानवी शरीराला खूप महत्वाचे आहे. त्यामुळे मानव आणि वडाचे झाड यांचे घट्ट ऋणानुबंध आहेत.

tree

आजकाल सगळीकडे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्या प्रदूषणात स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ऑक्सिजन मिळवणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला झाडे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वच्छ हवा मिळू शकते. एक वडाचे  झाड हे  २० टक्के ऑक्सिजन पुरवते, आणि  ४० टक्के कार्बन  डायॉक्साइड शोषून घेते.  वटवृक्षाच्या बाबतीत अनेक आख्यायिका आहेत. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वटसावित्री व्रत करतात. वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र  यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो.

baniyan  tree

वटवृक्षाच्या जन्म हा फांदी, पारंबी व पानातूनसुद्धा होतो. म्हणून त्याला अक्षयवट म्हटले गेले आहे.वडाच्या झाडाच्या चिकात कापूस वाटून त्याचे अंजन डोळ्यांत घातले असता मोतीबिंदू ठीक होतो. वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. छोट्या मोठ्या आजरांसाठी वटवृक्षाच्या वापर केला जातो. दाताच्या समस्या दूर होण्यासाठी, संधिवात कमी होण्यासाठी , वडाच्या झाडाचे पान वापरले जाते. वडाच्या सालीचा रस मधुमेह, आमांश व अतिसारात उपयोगी आहे. असे नानाविध उपयोग असल्यामुळेच या वृक्षाच्या पूजेची प्रथा पडली असावी. त्याचा वापर हा सरपणासाठी केला जातो. पायांच्या भेगांवर लेप देण्यासाठी वडाच्या फांद्या मदत करतात. त्यामुळे टाचेचे दुखणे पूर्णपणे कमी होते.