| |

खोकून खोकून छातीत दुखू लागलं?; जाणून घ्या खोकला पळवणारे घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खोकला ही शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्षिप्त क्रिया असते. जी श्वसनमार्गातील क्षोभजनक पदार्थ, धूर, धूलीकण, प्रदूषित हवा किंवा श्वसनमार्गातील जंतू फुप्फुसात गेल्याने निर्माण होणारी स्थिती असते. बहुतांश वेळा खोकला हा बदलत्या हंगामामुळे आणि सर्दीमुळे होण्याची शक्यता अधिक असते. मात्र छातीत कफ जमा झाल्यामुळे खोकला येत असेल तर हि शारीरिक स्थिती अत्यंत वेदनादायी होऊ शकते. कारण यामुळे खोकला येताच क्षणी छातीत कळा येतात. त्यामुळे खोकल्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

खोकला अत्यंत सर्वसामान्य आजार आहे अशी समजूत आहे. त्यामुळे थोडासाच खोकला आहे असे म्हणत अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यानंतर हळूहळू हा आजार मोठा होऊ लागतो. परिणामी खोकला मोठमोठ्या रोगांना आमंत्रण देण्यास सक्रिय होतो. म्हणून थोडासाच खोकला वेळीच आवरणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी विविध औषधांचा शरीरावर मारा करणे गरजेचे नाही. तर अगदी साध्यासोप्प्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही खोकल्यावर आराम मिळवू शकता. आता हे उपाय नक्की कोणते असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तरही लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-