मशरुम खाता पण त्याचे फायदे – तोटे माहित नाहीत?; मग लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपला आहार उत्तम तर प्रकृती एक नंबर. हि केवळ म्हणायची बाब नाही तर हीच वास्तविकता आहे मित्रांनो. त्यामुळे आजकाल धावपळीचे जीवन जगणारा प्रत्येकजण थोडा का होईना आपल्या डाएटकडे बारकाईने लक्ष देतात. त्यामुळे आहारात चांगल्या गोष्टींचा समावेश करण्याचा हल्ली ट्रेंड आला आहे. एखाद्या गोष्टीची न्युट्रिशनल व्हॅल्यू किती आहे हे पाहून ती खाल्ली जाते. त्यातल्या त्यात हल्ली एक्झॉटिक भाज्यांचासुद्धा ट्रेंड चालू आहे. आता एक्झॉटिक भाज्या म्हणजे काय असा काहींना प्रश्न पडला असेल तर उदाहरणार्थ- ब्रोकोली, रेड पेपर, झुकिनी, बेबी कॉर्न अशा भाज्या ज्या आता सगळीकडे उपलब्ध आहेत. यांपैकी एक छत्रीसारखा दिसणारा मशरुम लोक अतिशय चवीने खातात. चिकनला शाकाहारी पर्याय काय? म्हणून किंवा मग हेल्दी फूड म्हणून मशरुमकडे पाहिले जाते. पण तुम्ही चवीने खात असलेल्या मशरुमचे फायदे – तोटे माहीत आहेत का? जर तुमचे उत्तर नाही असे आहे तर हा लेख पूर्ण वाचा आणि जाणून घ्या मशरूम खाण्याचे फायदे आणि तोटे. पण त्याआधी नेमके मशरूम काय असते हे पाहूया.
० मशरुम म्हणजे काय?
– मशरुम ही एक बुरशी गटातील वनस्पती आहे. ही अशी बुरशी आहे जिचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. मुख्य बाब अशी कि, मशरुम आपोआप उगणारी वनस्पती आहे. अर्थात याची हल्ली शेती केली जाते. असे म्हणतात कि, मशरुम हे कुत्र्याने लघवी केल्यानंतर उगवते. अशाच विविध पद्धतीने वेगवेगळ्या प्रकाराचे मशरुम उगवतात. पण सांगायची अत्यंत महत्वाची बाब अशी कि, कोणतेही मशरुम्स खाल्ले जात नाही. काही ठराविक पद्धतीने उगवलेले मशरुम्सच खाल्ले जातात. कारण काही मशरुम विषारी असतात. त्यामुळे असे विषारी मशरुम खाल्ले जात नाहीत. भारतात जास्त करुन बटण मशरुम्स खाल्ले जातात. ज्यांचा आकार अगदी गोलाकार बटणासारखा असतो आणि त्याला खाली एक दांडी असते. सर्वसाधारणपणे ते दिसायला एखाद्या छत्रीसारखे क्युट दिसतात आणि खायला चविष्टदेखील असतात. पण ते अधिक काळ टिकत नाहीत.
० मशरुम खाण्याचे फायदे – मशरुममध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यांच्या आपल्या उत्तम आरोग्यासाठी उपयोग होतो.
१) मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन D असते. त्यामुळे या व्हिटॅमिनची कमतरता असणाऱ्यांनी मशरूमचे सेवन जरूर करावे.
२) मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात फायबरदेखील असते. जे आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत करतात.
३) मशरुमचे नियमित सेवन केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय आपल्या शरीराला चांगली उर्जा मिळते.
४) मशरुममध्ये सेलेनियम नावाचे घटक समाविष्ट असतात. जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
५) मशरुममध्ये अँटीऑक्सिडंट असतात. जे शरीरातील पेशींना मजबूत ठेवण्याचे काम करतात.
० मशरुम खाल्ल्यामूळे होणारे तोटे – ज्याप्रमाणे मशरुम खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला फायदे मिळतात. अगदी तसेच कधीकधी मशरूम खाल्ल्याने तोटेेही जाणवतात.
१) मशरुम हे नेहमी ताजे असायला हवे. जर ते शिळे किंवा खराब झालेले असतील तर त्यामुळे पोटांचे विकार संभवतात. त्यामुळे विकत घेताना मशरुम तपासून घेणे हि आपली जबाबदारी आहे.
२) काही व्यक्तींना मशरुमची एलर्जी असते. जर तुम्हाला मशरुम खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला तर त्याचे सेवन त्याच क्षणी थांबवावे. उदा – अंगावर पुरळ, लाल चट्टे, खाज, जीभ चुरचुरणे, थरथरल्यासारखे जाणवणे, उलटी होणे.
३) मशरुम खाताना तुम्ही कोणता प्रकार खाताय याची माहिती करून घ्या. त्याची शुद्धता माहीत असेल तरच त्याचे सेवन करा. अन्यथा मशरुम खाणे आरोग्यास घटक ठरू शकते.
० अत्यंत महत्वाचे –
१) मशरुम खरेदी करताना नेहमी ताजे खरेदी करा.
२) मशरुम घरी आणल्यानंतर २४ तासांच्या आता त्याचे सेवन करावे. अन्यथा त्याचे रूपांतर विषारी स्वरूपात होते.
३) मशरुमचा प्रकार जाणून घ्या आणि त्यानंतरच त्याचे सेवन करा.