| |

नाष्ट्यामध्ये पाव खातायं !!! आपल्या ‘या’ चुकीच्या सवयीमुळे होऊ शकते मोठे नुकसान

हॅलो आरोग्य ऑनलाईन । दिवसाच्या सुरवातीला सकाळी चांगला नाश्ता केल्यानं शरीर संतुलित राहतं, असा सल्ला दिला जातो. हा योग्यचं आहे. पण नाश्त्यामध्ये नेमकं काय खावं हे कुणीच सांगत नाही.  प्रत्येकजण सकाळी जे काही समोर येईल ते आपण खाऊन मोकळे होतो. आज अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही सर्रासपणे नाश्त्यामध्ये वापरत असता. पण तुमच्या नकळत त्या पदार्थांचा तुमच्या शरीरावर परिणाम व्हायला सुरुवात झालेली असू शकते… कोणते आहेत असे नाश्त्यातले धोकादायक पदार्थ आणि त्यांचे काय आहेत त्यांची लक्षणे.

 

यातला पहिला पदार्थ. प्रत्येकाचा आवडता आणि नाश्त्यासाठी निवडला जाणारा सगळ्यात पहिला पर्याय. तो म्हणजे मिसळ पाव. अनेकदा तुम्ही नाशत्याला मिसळ पाव खात असालंच. मिसळवरची तर्री इतकी भारी लागते की असा नाश्ता तुम्ही नाकारू शकत नाही. मात्र मिसळ पाव नाश्त्याला खाणं ही काही चांगली गोष्ट नाही. याचं कारण म्हणजे नाश्त्याला मिसळ पाव खाल्यानं शरीरातलं पौष्टिक मूल्य कमी होतं, आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. पावामधील मैद्याचा शरीरावर वाईट परिणाम होते. काबरेहायड्रेट्स, ग्लुकोजच्या अतिप्रमाणामुळे शरीराला याचे घातक परिणाम होतात. मात्र देशामध्ये पाव खाणाऱ्यांची संख्या अधिक असून तो खाणे थांबविणे अशक्य आहे. पावातून ‘पोटॅशियम ब्रोमेट’  हा कॅन्सरजन्य घटक शरीरात जात असल्याचं समोर आलंय. काही दिवसांपूर्वीच या संदर्भात एक अहवाल समोर आला होता. यात मैद्याने बनलेला पाव किंवा ब्रेड खाण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. त्यामुळे ब्रेड खाणं शक्यतो टाळा.

मिसळ पावनंतर सर्रास खाल्ला जाणारा नाश्त्यातला पदार्थ म्हणजे समोसा आणि वडापाव

सामोसा हा तर खूपंच घातक पदार्थ आहे. नाश्त्याला समोसा तुम्ही रोज खात असाल, तर लगेच सोडून द्या… मैद्यापासून बनलेला. बटाट्याचं mixture असलेला, तळलेला सामोसा खाल्लात तर तुमची सकाळ आणि अख्खा दिवस खराब होऊ शकतो. समोश्याने तुमचे पोट भरत असेल.. अनहेल्दी होतंय. हे ध्यानात असू द्या. बटाटा आणि मैदयाचा पाव असलेल्या वडापावमध्ये तर जवळपास 286 कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळी नाश्त्याला वडापाव खाताना एकदा नाही तर किमान दोनदा तरी विचार करा. सकाळच्या वेळेत बटाट्याचे सेवन शक्यतो करु नका. तसंच तेलकट पुरी आणि बटाट्याच्या भाजीचं कॉम्बिनेशन देखील तितकंसं चांगलं नाही. त्यामुळे पुरी आणि बटाट्याच्या भाजी देखील नाश्त्यासाठी टाळा.

तुम्ही साऊथ इंडिअन नाश्ता करण्याचा विचार करत असाल.. तर जरा थांबा.. इडली मेदूवडा हा देखील अनेकांचा आवडीचा नाश्ता.. त्यात मेदूवडा सांबार सगळ्यांचीच फेवरेट डीश, पण मेदूवडा अंबवलेला असतो आणि पचायला जड़ असतो, हे तुम्हाला माहिती आहे का?. आंबावलेल्या पदार्थांमध्ये ‘यीस्ट‘ नावाचा पदार्थ घालतात. जो शरीरासाठी अत्यंत घातक असतो. असे आंबवलेले पदार्थ खाल्ल्यावर स्कीन अॅलर्जी आणि पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मेदूवडा खायचा असेलंच तर दुपारच्या जेवणात खा. नाश्त्याला शक्यतो मेदूवडा खाणं टाळा.

उपवासाच्या दिवशी नाश्त्याला साबुदाणा खिचडी ठरलेली असते. साबुदाणा खिचडी नसेल. तर प्रत्येकाची पहिली पसंती असते ती साबुदाणा वड्याला. उपवासही होतो आणि चमचमीत खाण्याची हौसही भागते. मात्र बटाटा, साबुदाणा आणि तेल असे सगळे पदार्थ मिळून तयार झालेला साबुदाणा वडा पोटासाठी मात्र अतिशय धोकादायक असतो. कारण यामुळे आम्लपित्त होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे साबुदाणा खाणं टाळावं. त्या ऐवजी तुम्ही वरीचे तांदूळ, राजगीरा हे पदार्थ वापरू शकता व ते आरोग्यास अतिशय उत्तम आहेत.

आता असे वाटत असेल की आता खावे तरी काय? तर अंडी, दही, फळं, सुकामेवा, खजूर, पोहे, उपमा, लापशी यांसारखे पौष्टिक पदार्थ नाश्त्यासाठी आणि पर्यायाने आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. तसेच नियमित पोळी भाजी असा नाश्ता केल्यास अपाय अजिबात होत नाही. उलट त्याने फायदाच होतो.