मणक्यांचा आजाराबाबत जाणून घेऊया …
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजार-पाठ दुखी, मान दुखी- कंबर दुखी अश्या समस्या या जास्त जाणवायला लागल्या कि , मात्र आपल्याला पाठदुखीचा समस्या या काही प्रमाणात निर्माण झाल्या आहेत . हे लक्षात घ्यावे. अनेकांना विविध कारणांमुळे व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. रोजची दगदग, धावपळ, उठबस म्हंणजे व्यायाम नव्हे. व्यायाम न करणे व चुकीच्या जीवनशैलीमुळे पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखी आणि मणक्यांचे आजार लहानांपासून मोठ्यांना होत आहे. त्याची कारणे कोणकोणती आहेत ते जाणून घेऊया …
— शाळेत जातांना जास्त वजनदार दप्तराचे पाठीवर घेतलेली बॅग यामुळे मुलांना सुद्धा पाठदुखीच्या समस्या या जाणवायला लागल्या आहेत.
—- कामा निमित्ताने खुर्चीत जास्त वेळ बसणे हे पाठीसाठी अजिबात योग्य नाही.
— नेहमी बसताना चुकीच्या पद्धतीने बसने यामुळे सुद्धा पाठदुखी जाणवते.
—- वाहनातून प्रवास करताना खाच-खळगे, खड्ड्यांमुळे मणक्याला मार बसणे.
— नेहमी होणारी बद्धकोष्ठता याचा आपल्या शरीराला त्रास हा जास्त होतो.
— रात्रीचे जागरण व सकाळी उशिरा उठणे
— सतत चिंता येणे , शोक, वाटणे यामुळे सुद्धा पाठ दुखी वाढते.
— आपल्या शरीराला गरज हि फक्त आठ तासांची असते तरीही वयाच्या मानाने जास्त वेळ झोपणे.
—- स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा यामुळे पाठदुखी वाढतच जाते.