Litchi Benefits
|

Litchi Benefits: पावसाळ्यात मस्त चवीची लिची खा आणि एनर्जीसह इम्युनिटी मिळवा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन| मित्रांनो आरोग्य उत्तम राखण्यात फळांचा आहार फायदेशीर भूमिका निभावत असतो. त्यामुळे डॉक्टरही आवर्जून नियमित स्वरूपात किमान एक तरी फळ खा म्हणून सल्ला देत असतात. (Litchi Benefits) पण कोणते फळ कधी खावे याबाबत सतर्क राहणे तितकेच आवश्यक असते. कारण काही फळे नियमित फायदेशीर ठरतात तर काही फळे त्याच्या त्याच्या मौसमानुसार फायदे देतात.

आता मौसमी फळांमध्ये बऱ्याच फळांचा समावेश आहे. जसे की उन्हाळ्यात आंबा, पावसाळ्यात फणस आणि हिवाळ्यात स्ट्रॉबेरी ही मौसमी आणि अत्यंत लोकप्रिय फळे आहेत. तशीच या व्यतिरिक्त अशी अनेक मौसमी फळे आहेत जी आरोग्यासाठी लाभकारी ठरतात.

Litchi

मुळात उत्तम आरोग्य राखण्यासाठी नियमित आहारात फळ असायलाच हवे. पण तुम्ही जर एकच फळ आवडत म्हणून तेव्हढच खात असाल तर कसं चालेल…? तुम्ही जाहिरातींमध्ये पाहत असाल की, विविध फ्रूट ज्यूस मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. पण कृत्रिम फळांच्या रसापेक्षा अस्सल फळ कधीही फायदेशीर. म्हणून तज्ञ देखील फळ खा असे सांगतात.

आता राज्यात पावसाळ्याचा मस्त मौसम सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसात विविध औषधी रानभाज्या उगवतात आणि बाजारात विकल्या जातात. या भाज्यांची खासियत म्हणजे त्या फक्त पावसाळ्यातच उगवतात आणि याच हंगामात खाल्ल्यास फायदेशीर ठरतात. तसेच पावसाळ्याच्या दिवसात काही खास फळे देखील उगवतात. या फळांपैकी एक म्हणजे आंबट गोड इटुकली पिटुकली लिची. (Litchi Benefits)

Litchi

लिची हे फळ आकाराने लहान आणि चवीने काहीसे आंबट तर काहीसे गोड लागते. तिचा रंग स्ट्रॉबेरीसारखा लाल दिसतो. त्यामुळे ती दिसायलाही अत्यंत आकर्षक असते. हे फळ लहान मुलांना खायला फार आवडते. कारण त्याची चव आणि रसरशीत लाल रंग मुलांना आकर्षित करतो. हे फळ दिसायला भले लहान असेल. पण लिची आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभकारी मानली जाते.

(Litchi Benefits) हे फळ अगदी वजन कमी करण्यापासून ते शारीरिक ऊर्जा देईपर्यंत आणि आपली रोगांशी लढण्याची ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर भूमिका बजावते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात लिची खाणे टाळू नका. तर आवडीने आणि जबाबदारीने हे फळ तुम्हीही खा आणि मुलांनाही खायला द्या.

० लिची फळातील आरोग्यदायी गुणधर्म –

(Litchi Benefits) लिची आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून त्यात शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक असतात. लिचीमध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न हे घटक मुबलक प्रमाणात असतात.

Litchi

तसेच लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते, लिचीमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो.

साधारणपणे हे फळ खाल्ले जात नाही. कारण या फळाची चव गोडपेक्षा आंबट जास्त असते. मात्र या फळाचा रस प्यायला जातो आणि तोही आवडीने. पण या फळाचा रस जितके आरोग्यदायी फायदे देत नाही तितके आरोग्यदायी लाभ लिचीचे हे अख्खे फळ देते. म्हणूनच आज आपण लिची फळ खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. त्यामुळे फार प्रस्तावना न देता आपण थेट फायदे जाणुन घेण्याकडे वळूयात. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

पावसाळ्यात लिची खाण्याचे फायदे
(Litchi Benefits)

1. शारीरिक ऊर्जा वाढविण्यासाठी मदत करते – पावसाळ्यात आपल्याला खूप भूक लागते. पण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही. शिवाय पाऊस सुरू होण्याच्या काळात भूक काहीशी मंदावते. (Litchi Benefits) यामुळे शारीरिक उर्जेवर याचा मोठा परिणाम होतो.

strong men

अशावेळी जर लिची खाल्ली तर आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळण्यास मदत होते. त्यामधील नियासिन घटक शरीरात हिमोग्लोबिन निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते आणि कमकुवतपणा वाटत नाही.

2. रोगांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत करते – पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता फार जास्त असते. त्यामुळे रोगांशी लढण्यासाठी आपली शारीरिक रोग प्रतिकार क्षमता अतिशय मजबूत असायला हवी. पण या दिवसात तीच तर कमकुवत होते. यासाठी लिची फायदेशीर आहे. (Litchi Benefits)

Immunity

अगदी कपभर लीचीमध्ये सुमारे १३६ मिली ग्राम व्हिटॅमिन सी असते. या व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकार शक्ती चांगली राहण्यास आणि मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित लिची या फळाचे सेवन करा. म्हणजे पावसाळी संसर्गाची भीती वाटणार नाही.

3. पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते – पावसाळा म्हटलं कि, पाण्यात बदल आणि यामुळे पोटाचे आरोग्य खराब होऊच शकते. पण अशावेळी जर आहारात लिची असेल तर पोटाच्या आरोग्याची चिंता नाही.

Stomach Pain

कारण लिचीमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. यात पोट हलके राहण्यासदेखील या फळाचा मोठा फायदा होतो. त्यामुळे ज्यांना पचनाशी निगडीत समस्या आहेत त्यांनी आहारात नियमितपणे लिची या फळाचा आवर्जून समावेश करा. 

4. त्वचेच्या समस्यांवर प्रभावीपणे काम करते – ऋतू बदलत असताना आपल्या शरीरावर आणि त्वचेवर परिणाम करत असतो. यातील काही परिणाम चांगले तर काही वाईट असतात. (Litchi Benefits) वाईट परिणामांवर वचक बसवायचा असेल तर आहारात लिचीचे फळ असायलाच हवे.

Beautiful Face

कारण लिचीमध्ये अँटी ऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचेवरील काळे डाग, फोड कमी होण्यास अतिशय फायदा होतो. म्हणूनच त्वचा रोग तज्ञसुद्धा आहारात लिची खाण्याचा सल्ला देतात.

5. सुरकुत्या कमी होतात – वय वाढले म्हणजे सुरकुत्या येणारच. पण कमी वयातच सुरकुत्या आल्या तर..? म्हणजे म्हातारपण आल्यासारखेच वाटणार ना..? असा सुरकुतलेला चेहरा आरश्यात पाहायला कुणालाच आवडत नाही.

Early Age Wrinkles

अशा लोकांनी जर नियमित लिची हे फळ खाल्ले तर चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण खूप कमी होते. हे फळ दिसायला असले आहे पण त्वचेच्या आरोग्यासाठी १००% गुणकारी आहे.

6. वाढलेले वजन कमी करण्यास वेग देते – (Litchi Benefits) वाढलेले वजन ही एक अशी समस्या आहे जिच्यामुळे न जाणे कित्येक लोक त्रासलेले आहेत. या समस्येने सध्या अनेक लोकांचे जगणे मुश्कील केले आहे. जर तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर वजन कमी करण्यासाठी लिची उपयोगी ठरेल.

Weight gain

लिचीच्या १ कप गरामध्ये साधारण १२५ कॅलरीज असतात. शिवाय यामध्ये फॅट्सचे प्रमाणदेखील अतिशय कमी असते. म्हणूनच या फळात फायबर मुबलक प्रमाणात असते आणि यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. 

7. शरीरातील रक्ताशी संबंधित समस्यांवर प्रभावी – लिची हे एक असे फळ आहे जे खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताशी संबंधित कोणतीही समस्या दूर होते.

Blood

कारण हे फळ शक्तिवर्धक, रक्ताभिसरण व्यवस्थित करणारे रक्ताशी संबंधित कोणत्याही प्रभावीपणे काम करणारे फळ आहे. (Litchi Benefits)

‘हे’ पण वाचा :-

Without Peeling Fruits: ‘हि’ फळं सोलून खाताय..? तर लगेच थांबा; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Dry Fruits: उन्हाळ्यात ड्राय फ्रूटचे सेवन कसे करालं..?; जाणून घ्या

Health Benefits of Jamun: गडद जांभळात दडलेत आरोग्यदायी फायदे; माहित नाहीत..? तर जाणून घ्या

Healthy Fruits : ‘हि’ फळे खालं तर, पोटाच्या तक्रारी राहतील दूर; जाणून घ्या