कोरोनामुळे लोकांच्या राहणीमानावर अनेक दीर्घकालीन परिणाम
हॅलो आरोग्य ऑनलाईन । कोरोनाने साऱ्या जगाला त्रास झाला बऱ्याच महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात आपण आपल्या तब्बेतीची काळजी घेणे गरजेचे आहे . कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे लोकांच्या राहणीमानावर अनेक दीर्घकालीन परिणाम होताना दिसत आहेत.
कोरोनाच्या काळात आपल्याला काही आठवडे तरी घराच्या बाहेर पडायला सक्त मनाई केली होती . या विषाणू मुळे अनेक लोकांना बाहेर पडण्यास तसेच काही महिने कोणाच्याही संपर्कात न येण्यास सरकारने आदेश काढले होते. एकमेकांच्या संपर्कातून दुसऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार होण्याचा धोका हा जास्त प्रमाणात असतो. याच दुष्परिणामेच्या संकल्पाला ‘लॉंग कोविड’ असेही म्हंटले जाते . यामुळे रुग्णाच्या मानसिक आणि शारीरिक गोष्टींवर खूप परिणाम होताना दिसत आहे. मानसिक आजारांना सामोरे जावे लागत असल्याने आपले स्वास्थ हे बिघडू शकते.
कोरोनाच्या काळात तुमच्या शरीरामध्ये थकवा जाणवायला सुरुवात होते. थकवा येणे, कमी हालचालीनंतरही श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, स्नायूदुखी आणि सांधेदुखी, ऐकू कमी येणे, दृष्टी दोष, वास न येणे आणि तोंडाची चव जाणे ही लाँग कोविडची सर्वसाधारण लक्षणे आहेत. लाँग कोविड झालेल्या अनेक रुग्णांना मानसिक स्वास्थ्यविषयक समस्याही उद्भवल्याचे दिसून आले आहेत. यात तणाव, चीडचीड यांपासून नैराश्यपर्यंतच्या लक्षणांचा समावेश आहे. कोरोनातून बरे होऊन आल्यानंतर काही काळ तरी आराम करणे गरजेचे आहे. लगेच कोणत्याही स्वरूपाचे काम करण्यास सुरुवात करू नये. पूर्वीच्या रुटीन मध्ये काही बदल करून आपल्या दररोजच्या कार्यक्रमात बदल करणे आवश्यक आहे.
दररोज च्या कामकाजातून वेळ काढला पाहिजे आणि आपल्या प्रायॉरिटीज या ठरल्या पाहिजेत . आपल्या नियोजनाचे स्वरूप हे घरातील लोकांना सुद्धा सांगा त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब करता येणार नाही. आपल्या दररोज च्या वेळेत काही वेळ हा स्वतःसाठी द्या. आणि व्यायामाला महत्व द्या. कामाच्या नियोजनानुसार प्रत्येक गोष्टीला महत्व द्या.