दातांची चमक हरवली आहे? मग हे घरगुती उपाय वापरून पहाच; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण आपल्या शरीरासह आपली त्वचा कशी उत्तम राहील याकडे नेहमीच लक्ष देत असतो. मात्र या सगळ्यात आपण आपल्या तोंडाची काळजी घ्यायला विसरतो. मुळात आपल्या शरीराच्या आणि त्वचेच्या आरोग्यासह आपण आपल्या तोंडाची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. कारण आपले तोंड जर निरोगी आणि स्वच्छ असेल तर आपले आरोग्यही तितकेच उत्तम राहते. मुळात अनेक कारणांमुळे आपल्या दातांची चमक विरते आणि मग त्यांचा रंग पिवळा होऊ लागतो. कालांतराने हा रंग अधिकच गडद होऊ लागतो. जे दिसताना अतिशय घाणेरडे आणि अस्वच्छ जाणवते.
मुख्य बाब अशी, कि दातांची चमक जाण्यामागे अनेक अश्या गोष्टी कारणीभूत असतात ज्या आपल्याला ठाऊक नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. आपली चुकीची जीवनशैली हि मूळ दंत समस्यांचे लक्षण असते. त्यामुळे आता पिवळ्या किंवा डागलेल्या दातांमुळे तुम्हाला लाज वाटण्याची काहीच गरज नाही. आता तुम्ही म्हणाल का? तर या का चे उत्तर असे कि, आम्ही तुम्हाला दात स्वच्छ करण्याचे काही उत्तम पर्याय सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही आपल्या दातांची हरवलेली चमक पुन्हा मिळवू शकता. या आधी आपण दात पिवळे होण्याची करणे जाणून घेऊयात.
० दात पिवळे होण्याची कारणे कोणती?
– कॉफी, चहा, कोला, वाइन, सफरचंद किंवा बटाटे यांसारकाही पेय, फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने दात डागाळण्याची शक्यता असते.
– धूम्रपान किंवा तंबाखू चघळल्यामुळेदेखील दातांचा रंग गलिच्छ होतो.
– तोंडाच्या अस्वच्छतेमुळे दातांवर प्लाक जमा होऊ लागतो आणि दातांचा रंग पिवळा होतो.
– अनेक रोग आणि गर्भधारणेमध्ये, दातांचा बाह्य थर कमकुवत होतो आणि तो अस्वास्थ्यकर बनतो. यामुळेदेखील दातांची चमक कमी होते.
– काही अशी औषधे आहेत ज्यांच्या सेवनामुळेदेखील दात पिवळे होतात.
– वृद्धत्व आणि अनुवांशिक कारणांमुळे, दात त्यांची चमक गमावतात.
० डागाळलेले दात चमकावण्यासाठी कोणते उपाय कराल?
१) बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस.
– दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी, एका वाटीत २ चमचे बेकिंग सोडा आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. हि पेस्ट आपल्या टूथब्रशवर लावा आणि ती किमान दोन वेळा दातांवर लावा. ही पेस्ट दातांवर मिनिटभर तशीच सोडा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चूळ भरून तोंड स्वच्छ करा. यामुळे कोणताही राप वगैरे तुमच्या दातांवर राहणार नाही आणि दातांची चमक पुन्हा येण्यास मदत होईल.
२) मोहरीचे तेल आणि मीठ.
– यासाठी ३ चमचे मोहरीचे तेल आणि त्यात १ चमचा मीठ मिसळा. आता याची पेस्ट हलक्या बोटाने दातांवर चोळत मालिश करा. या दरम्यान किमान ३ मिनिटे दात व्यवस्थित मालिश करा आणि मग स्वच्छ पाण्याने चूळ भरून तोंड धुतल्याने लगेच जिथच्या तिथे तुम्हाला निकाल मिळेल.
- अत्यंत महत्वाचे :- जर तुम्हाला तोंडामध्ये कोणत्याही प्रकारची जखम, फोड किंवा तोंडात समस्या वा उष्णतेच्या समस्या जाणवत असतील तर यातील कोणताही उपाय करू नका. तसेच, या घरगुती उपचारांचा बराच काळ वापर करू नका. अगदीच समस्या मोठ्या जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.