लाडावलेली मुले आणि त्याची कारणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजूबाजूला अशी अनेक मुले आपण पाहतो कि ती मुले खूप जास्त लाडावलेली असतात. पण त्यासाठी कधी कधी त्यांच्या आई वडिलांना दोष दयायला सुरुवात करतो. अतिशय लाडावलेली मुले हि कोणाचेही जास्त ऐकत नाही. ते स्वतःचीच मनमानी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जवळ मोठी लोक आहेत .त्याच्या काही गोष्टी ऐकल्या गेल्या पाहिजेत. हे त्यांच्या तत्वात बसतच नाही. त्यामुळे मुलांना वेळीच योग्य ते संस्कार देणे गरजेचे आहे . तसेच आजकाल घरात सिंगल मुले याची प्रथा पडली गेली आहे. त्यामुळे जे काही करायचे आहे , ते फक्त मुलांसाठी त्यामुळे मुलांचा प्रत्येक हट्ट हा पुरवला जातो. पण सतत पुरवला जाणारा हट्ट सुद्धा योग्य नाही .
अनेक वेळेला आपल्या घरात आपल्या बाळाला सांभाळण्यासाठी कोणीच उपलब्ध नसते. त्यामुळे अश्या वेळी मुलाला पाळणाघरात ठेवले जाते. त्यामुळे मुलांच्यावर लक्ष राहत नाही. दिवसभर मुले आपल्या जवळ राहत नाहीत त्यामुळे प्रत्येक आई वडील मुलांचे लाड पुरवण्यात व्यस्त असतात. त्यांना कोणत्याच गोष्टीसाठी नकारात्मकता मिळत नाही . म्हणून मुले हि जास्त लाडवतात . अनेक वेळा आई वडिलांचे लक्ष राहत नसल्याने सुद्धा मुलांना समस्या या जास्त जाणवतात. काही वेळेला लहान मुले आजी आजोबांकडे असतात. मुले लहान असल्याने आजी – आजोबा सुद्धा मुलांना रागवत नाहीत . त्यांच्या केलेने घेण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही मुले कोणाचे ऐकत नाहीत.
अनेक वेळा आई वडील हे खूप तापट असतात. त्यामुळे मुलांनी एखादी चुकीची गोष्ट केली तर त्यांना ते सहन होत नाही. लगेच त्याच्यावर हात उचलतात. त्यामुळे मुले हि घाबरतात. त्यांच्या जवळ जाण्यास टाळाटाळ करतात. अश्या वेळी मुलांच्या कलेने घेण्याचा प्रयत्न आई वडिलांनी केला गेला पाहिजे. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते कि , आपल्या मुलाने आपले तसेच आपली घरातील प्रत्येक व्यक्तीचे ऐकले गेले पाहिजे. त्यासाठी आई वडिलांची सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या कामातून काही वेळ आपल्या लहान मुलांना देणे आवश्यक आहे. तेव्हाच मुले हट्टी होणार नाहीत. गरज असेल तेव्हा इतरांची सुद्धा मदत घ्यायला विसरू नका.