मातीच्या भांड्यात बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। बदलती जीवनशैली आपल्या आरोग्यावर परिणाम करीत असते. आपली रोजची धावपळ आणि दगदगीचे जीवन दोन्ही आपल्यासाठी अनेको आरोग्याच्या समस्या उभ्या करतात. त्यामुळे आपण आपल्या आरोग्यासाठी विचारपूर्वक गोष्टींचा वापर केला पाहिजे. आजकाल कमी वेळात स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. या उपकरणातून काम नक्कीच लवकर होते पण याचा शरीराला हवा तितका फायदा होत नाही.
जुन्या काळात लोक कोणत्याही मशीनचा वापर न करता अगदी दगडी आणि मातीची भांडी जेवण बनविण्यासाठी वापरात असत. यामागे जितकं शास्त्र तितकं आरोग्य देखील दडलं आहे. कारण, अॅल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या भांड्यांपेक्षा मातीची भांडी वापरल्यास शिजवित असलेल्या अन्नातील पोषक घटक जसेच्या तसे राहतात आणि याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो. मात्र शहरातील आधुनिकतेसोबत मातीची भांडी हळूहळू इतिहासजमा झाली. पण आता पुन्हा एकदा बाजारात मातीची भांडी इतर धातूच्या भांड्यांना टक्कर देताना दिसत आहे. चला तर मग मातीच्या भांड्यात जेवण शिकविण्याचे फायदे जाणून घेऊयात. खालीलप्रमाणे ::
१) चविष्ट तितके आरोग्यासाठी उत्कृष्ट – मातीच्या भांड्यामध्ये बनवलेले जेवण धातूच्या भांड्यात बनविलेल्या जीवनापेक्षा अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट असते. जसे की, मातीच्या तव्यावर चपाती करतांना मातीचे तत्व चपातीमध्ये शोषले जातात आणि यामुळे चपातीची पौष्टिकता वाढते.
२) गॅस व अपचनची समस्या दूर – पोटात गॅस होणे वा अपचनाची समस्या असेल तर मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाणे उत्तम. कारण मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नामुळे या समस्या होत नाहीत.
३) शरीराला पोषक तत्त्वांचा पुरवठा – आपल्याला निरोगी राहण्यासाठी दररोज किमान १७ पोषक तत्त्व गरजेची असतात आणि मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्यास ही गरज पूर्ण होते. कॅल्शियम, सल्फर, सिलीकॉन, कोबाल्ड आणि अशी अनेक पोषक तत्त्वंं मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे आपल्या शरीराला मिळतात.
० मातीची भांडी वापरताना काय काळजी घ्याल?
– मातीची भांडी घेताना नेहमी त्याचा तळ तपासून पाहावा. ज्या त्या भांड्याचा तळ जाड असायला हवा. नाहीतर उष्णतेने भांडे तडकते. शिवाय मातीची भांडी नवीन असतील तर ती किमान २४ तास पाण्यात पूर्ण बुडवून ठेवावी आणि नंतर ती भांडी व्यवस्थित सुकवून घ्यावी. याशिवाय वापर झाल्यावर काही अन्नकण त्यात अडकून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे या भांड्यांच्या वापरानंतर त्यात गरम पाणी ओतून भांडी स्वच्छ करावी. यामुळे तेलाचा तवंग आणि अन्नकण सहज निघून जाण्यास मदत होते.