बटाटा आणि ओटस च्या मदतीने करा कमी टॅन
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपला आहार हा योग्य प्रकारचा असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला चेहऱ्याच्या खूप जास्त प्रमाणात समस्या या जाणवणार नाहीत . पण जर आहार योग्य नसेल किंवा सतत कोणत्या ना कोणत्या कामाचे टेन्शन असेल किंवा जास्त वेळ जागरण असेल त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम हा हळूहळू दिसू शकतो. त्यामुळे पिंपल्स येणे. चेहरा काळा पडणे या समस्या जास्त जाणवतात. अशा वेळी रासायनिक एकदा वस्तूचा वापर करण्यापेक्षा घरगुती पद्धतीच्या बटाटा आणि ओटस याचा वापर करू शकता कसे ते जाणून घेऊया ….
बटाटा आणि लिंबाचा रस—
बटाट्याचा रसदेखील टॅनिंगवर रामबाण उपाय आहे. एक बटाटा किसून त्यात तुम्हाला लिंबाचा रस घालायचा आहे. बटाटा आणि लिंबू या दोघांमध्ये ब्लिचिंग एजंट आहे. हा रस साधारण १५ ते २० मिनिटे तुम्हाला लावून ठेवायचा आहे. त्यानंतर थंड पाण्याने हात- पाय धुवन घ्या. अंग कोरडे करुन त्यावर चांगले मॉश्चरायझर लावा. हा रस तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच लावा. कारण त्यामुळे तुमची त्वचा शुष्क होऊ शकते. हा प्रयोग काही दिवस केल्यानंतरच त्याचा परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर दिसू शकतो.
ओट्स—-
ओट्स ज्याप्रमाणे सध्याच्या हेल्दी लाईफसाठी आवश्यक आहे. आहारात जर ओटस चे प्रमाण योग्य ठेवले तर मात्र आपले वजन हे योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते. अगदी त्याचप्रमाणे ते तुमच्या त्वचेसाठीही चांगले आहे. त्याचे एका ठराविक प्रमाणात मिश्रण केले तर ते फायदेशीर राहणार आहे . मिश्रण तयार करताना थोडेसे ओट्स घेऊन त्यात तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्याची थीक पेस्ट करुन घ्यायची आहे. आणि ती तुम्हाला टॅन झालेल्या भागावर लावायची आहे. ओट्स तुमच्या शरीरावरील मृत त्वचा काढून टाकते. आणि त्वचा उजळते . उन्हामुळे अनेकदा तुमची त्वचा मृत होऊ लागते. ही मृत त्वचा काढण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. शिवाय ओट्समुळे तुमची त्वचा छान गुळगुळीत होते. त्यामुळे ओटस चा वापर सुद्धा अनेक सौदर्य प्रसाधने यांच्यामध्ये केला जातो.