Bathing
| | |

अंघोळ करताना ‘या’ चुका केलात तर त्वचेचे गंभीर आजार होतील; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। माणसाच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे स्वच्छता. कारण स्वच्छतेशिवाय आपले शरीर आणि मन दोघेही निरुत्साही राहतात. यासाठी सगळ्यात आरोग्यदायी सवय आंघोळ आहे. जी शरीराला ताजे आणि आरोग्याला निरोगी ठेवते. कारण अंघोळीमुळे आपल्या अंगावर साचलेली घाण, घाम, दुर्गंधी दूर होते. यामुळे आपल्या त्वचेवर साचलेले बॅक्टेरिया दूर होतात आणि आपल्या शरीराच्या आरोग्याचे रक्षण होते. शिवाय नियमित अंघोळ हृदयविकाराचा धोका कमी करते. कारण यामुळे श्वसन प्रणाली मजबूत होते, मज्जासंस्था सुधारते, स्नायू तसेच हाडं बळकट होतात. असे अनेक फायदे असतात अंघोळीचे. पण तुम्ही कधी अंघोळीच्या तोट्यांविषयी ऐकले आहे का? हो. तुम्ही बरोबर वाचताय अंघोळीचे तोटे.

मित्रांनो, अंघोळ करताना जर काही चुका तुमच्या कळत वा नकळत झाल्या तर निश्चितच तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन त्वचा कोरडी पडते. परिणामी त्वचेचे गंभीर आजार होऊ शकतात. यामध्ये एक्जिमा, सोरायसिस, ड्राय स्किन यांसारखे त्वचारोग होण्याची शक्यता अधिक असते. पण आपल्याला माहीतच नसते कि नेमकं चुकतंय काय? तर आपण चुका टाळणार कसे? असे अनेक प्रश्न आता तुम्हाला पडले असतील. तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला अंघोळी करताना होणाऱ्या चुकांबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेला विकारांपासून दूर ठेऊ शकाल. जाणून घ्या खालिलप्रमाणे:-