heat in body
|

शरीरातील उष्णतेचा दोष कमी करण्यासाठीचे उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीरात जर उष्णतेचे प्रमाण हे जास्त असेल तर अश्या वेळी आपल्याला उष्णतेच्या संबंधित अनेक रोग हे होतात. उष्णता हि वाढली असता , शरीरात खाज सुटण्याचे प्रमाण वाढत जाते. तसेच लघवीच्या जागेवर आग आग होण्यास सुरुवात होते . अवघड जागेवर झालेल्या दुखण्यामुळे कोणत्याच गोष्टींकडे लक्ष लागत नाही. नेहमी खाजवण्यास वाटते. अवघड जागेवर खाज सुटल्याने आपले हात आपोआप तिकडे वळतात. त्यामुळे चार लोकांच्यात अजून कमी पणा जाणवतो.  अश्या वेळी  हे दुखणे लवकर दूर होण्यासाठी  काही प्रमाणात उपाय करणे तर आवश्यक आहे . आपली शरीरातील उष्णतेसाठी काही घरगुती उपाय पाहूया …

उपाय —

— आपल्या आहारात शीत आहारात दूध, दही, तुपाचं सेवन करावं.

— तुपाचा गुणधर्म थंड असल्यानं पोटात थंडावा आणि उष्णता कमी करण्यास मदत करतं.

— आहारात ताक घेताना त्यात पुदिना, धणे-जीरे पूड, हिंग घालून घेतल्यानं अधिक फायदा होतो.

— रोज रात्री तळपाय, हाताला तेल लावून  वाटीनं पाय घासावेत, यामुळे झोप शांत लागते. हाता-पायाची उष्णतेनं होणारी जळजळही कमी होते.

— जळवात होत असेल तर रक्त चंदनाचा लेप उगाळून लावावा. रक्त चंदन उगाळून पाण्यातून घेतल्यानंही त्याचा फायदा होतो.

— दूध, सरबत किंवा साध्या पाण्यातून 1 चमचा सब्जा अथवा तुळशीचं बी घ्यावं.

— शरीरात गारवा टिकून राहण्यासाठी रोज सकाळी गुलकंद खाल्ला तर शरीराला मदत होते .

— — रोज सकाळी नुसतं लिंबूपाणी प्यायल्यानं शरीरातील नको असलेले टॉक्सिन्स निघून जातात. मात्र हे सुरू केल्यानंतर चहा-कॉफी घेणं टाळावं.

— फळ, फळभाज्या यांचा आहारात जास्त वापर करावा. याशिवाय उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शक्यतो रात्री उशिरा जेवणं टाळावं.

— आहारात पेज किंवा शक्यतो हलका आहार घ्यावा.

— अति तेलकट, तिखट, फास्टफूडसारखे पदार्थ टाळावेत ज्यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते.

— पित्तासाठी आमसुलाची कढी, आमसूल पाण्यात घालून घ्यावं. सोलकढी, कोकम साखरेत घालून ते रोज एक चमचा खाल्ल्यानंही त्रास कमी होतो.

— नाचणी थंड असल्यानं आंबिल, नाचणी, तांदळाची भाकरी किंवा नाचणीची उकड ताकामधून घ्यावी.

— उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.