कल्पवृक्ष शेवगा!!! शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच आणखी ‘हे’ आहेत औषधी गुणधर्म
हॅलो आरोग्य ऑनलाईन : शेवग्याची शेंग सर्वाधिक प्रमाणात भारतात वापरले जाते.शेवग्याच्या फक्त शेंगाच नाही तर बरेच जण त्याची पाने आणि फुलेही खातात. शेवग्याची पाने मधुमेहावर गुणकारी असल्याचे ही सिद्ध झाले आहे. शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने तुम्ही बर्याच गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. शेवग्याची शेंग कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक द्रव्यांसह समृद्ध असते. शेवग्याच्या शेंगशिवाय सांबाराला चवच येत नाही. आहे. बरेच लोक सांबारमध्ये शेवग्याची शेंग वापरतात. शेवग्याच्या शेंगमुळे केवळ सांबारची चवच वाढत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.आयुर्वेदात ड्रमस्टिकचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
शेवग्याच्या पानांबरोबरच शेवग्याच्या शेंगाही आरोग्यास अतिशय लाभदायक आहेत. या शेंगामध्ये शरीराच्या पोषणासाठी आवश्यक जीवनसत्वे, क्षार आणि इतर पोषक तत्वे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याकडे सांबारमध्ये किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा निरनिराळ्या डाळींच्या वरणामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायची पद्धत आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. आपल्या आहारामध्ये शेवग्याचा नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते.
शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. घसा खराब असल्यास किंवा ब्रॉन्कायटीस चा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगा घालून तयार केलेले सूप प्यायल्याने आराम मिळतो. गर्भवती महिलांनी शेवग्याच्या शेंगांचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करावा. शेवग्याच्या शेंगांमध्ये आणि पानांमध्ये असलेली पोषक तत्वे शाहिराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी आहेत. या शेंगांमध्ये असलेली बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे (नियासिन, रिबोफ्लाविन, फॉलिक असिड) पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
शेवग्याचे झाड लावणे आणि त्याची मशागत करणे अगदी सोपे असल्याने. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते होतो. शेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. साधारण 100 ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत. आज, या लेखाच्या माध्यमातून, आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंग खाण्याचे फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
शेवग्याचे आरोग्यदायी फायदे:
- शेवग्याच्या पानांच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या ग्लुकोज लेवल्स नियंत्रणात ठेवण्यासही शेवग्याच्या पानांचा रस उपयुक्त आहे.
- शेवग्याच्या पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत मिळते.
- शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी एन्टीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो.
- शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते.
- डोकेदुखीचा त्रास उद्भविल्यास शेवग्याची पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी करण्यास मदत होते.
- शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधाचे काम करते.
- शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्व ‘बी’ हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे ‘तोंड येणे’ या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.
- मधुमेह, मूतखडा यांपासून ते हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.
- कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो.
- आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.
- डोळ्याचा आजार कमी करण्यास मदत होते.
- शेवग्याच्या फुलांची भाजी हि संधिवात व हाडाच्या आजारावर फायदेशीर ठरते.
- शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी खावी.
- कान वहात असेल तर याची फुले सावलीत वाळवून त्यावे वस्त्रगळ चूर्ण करून कानात घालावे.
- गळू झाले असल्यास त्यावर याची साल उगाळून लावल्यास गळू जिरते.
- पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात.
- शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे.
- शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
- वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.
- एक ते तीन वर्षांच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवग्याला वरदान मानले जाते.
- शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.
- शेवग्याचे ज्यूस गर्भवती महिलेला देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या त्रासामध्ये आराम मिळतो आणि प्रसूतीनंतर आईला वेदना कमी प्रमाणात होतात.
- शेवग्यामध्ये जीवनसत्व ‘ए’ असते जे सौंदर्यवर्धक स्वरुपात काम करते तसेच डोळ्यांसाठी हे लाभदायक आहे.
- चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे.
- शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते.
या कारणांस्तव आरोग्याकरिता शेवगा अतिशय लाभदायक ठरत आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला चमत्कारी वृक्ष असे म्हटलेले आहे.