पुदिन्याची पाने आरोग्यास अत्यंत गुणकारी; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पुदिना म्हणजे काय? तो कसा दिसतो? हे आपण सारेच जाणतो. तसे पाहता पुदिन्याची नानाविध नावे आहेत. संस्कृतमध्ये त्याला सुंधितपत्र, हिंदीमध्ये पेपरमिंट किंवा विलायती पुदिना, गुजरातीमध्ये पुदिनो, मराठीमध्ये पेपरमिंट आणि इंग्रजीमध्ये ब्रांडी मिंट असे संबोधले जाते. भले मराठीमध्ये त्याला पेपरमिंट संबोधत असतील, मात्र पुदिना याच नावाने त्याची अत्याधिक ओळख आहे. कधी सॅन्डविचसाठी चटणी तर कधी बिर्याणीच्या खमंग सुवासासाठी पुदिन्याचा वापर होतो. मात्र पुदिना या व्यतिरिक्त आरोग्याशी अत्यंत गुणकारी आहे हे फार कमी लोक जाणतात.
अगदी आपल्या आजीच्या काळापासून वापरला जाणारा पुदिना हे एक सुवासिक वनस्पतीत आहे. हि वनस्पती साधारण सुमारे ३० ते ६० सेमी उंच आणि सुवासिक असते. पुदिन्याचे सेवन आपल्याला अनेक आजारांपासून मुक्त होण्यास मदत करते. शिवाय त्याचा रस आणि तेल इत्यादी औषधांसाठी हि वनस्पती गुणकारी आहे. तर चला जाणून घेऊयात पुदिन्याचे आरोग्याशी संबंधित फायदे :-
१) सर्दी, पडसे आणि कफ, खोकला – हवामानात अचानक बदल झाल्यानंतर अनेकांना सर्दी, पडसे किंवा कफ, खोकला होतो. अश्या या आजारांवर पुदिना अत्यंत प्रभावी आहे. गरम पाण्यात पुदिन्याच्या काड्यांसह पाने घालून त्याची वाफ घेतल्याने या आजारांपासून आराम मिळतो.
२) पोटदुखी – अनेकदा जिभेला रुचणारे पदार्थ चवीपायी अधिक खाल्ले जातात. यात कित्येकदा तेलकट, मसालेदार आणि तिखट पदार्थांचा समावेश असतो. यांच्या सेवनामुळे पोटात गॅस,अपचन, पोटदुखी,अस्वस्थता यांसारखे त्रास जाणवतात. या त्रासांवर आराम मिळवण्यासाठी २५ ते ३० पुदिन्याची पाने वाटून त्याच्या रसात साखर घालून सेवन करावे.
३) दातदुखी – दातदुखीसाठी पुदिना अत्यंत गुणकारी आहे. आजकाल अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच दातदुखीच्या समस्या उदभवतात. यासाठी, पुदिन्याची २ ते ३ पाने स्वच्छ धुवून हातावर चुरून दुखत असलेल्या दातांच्या मध्ये ठेवल्याने वेदना कमी होण्यास आराम मिळतो.
४) अतिसार – चुकीच्या जीवनशैलीत खाण्या- पिण्याकडे दुर्लक्ष केल्याने अतिसाराची समस्या उदभवते. अशा वेळी पुदिन्याच्या पानाचा ५ ते १० मिलिग्रॅम काढा बनवून प्यायल्याने मुरडयुक्त अतिसारात त्वरित आराम मिळतो. शिवाय पोटाशी निगडित अन्य त्रास दूर होण्यास आराम मिळतो.
५) कमी वयातील केस गळती – आजकाल धूळ, माती आणि प्रदूषणामुळे खूप कमी वयापासूनच केसांच्या समस्या होतात. यात केस गळतीच्या समस्येचा आकडा मोठा आहे. यासाठी नारळाच्या तेलात पुदिन्याच्या तेलाचे ३ ते ५ थेंब मिसळून डोक्याची मॉलिश करा आणि हे तेल अर्धा तास असेच केसांत मुरू द्या. यानंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केस गळतीच्या समस्यांपासून हळूहळू मुक्तता होईल.