मधुमेह आणि मध यांच्यामधील असलेले गैरसमज
हॅलो आरोग्य ऑनलाईन । मध हा नैसर्गिक रित्या तयार होतो. मध हा आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. आयुर्वेदीक दृष्ट्या मधाला फार महत्व आहे. पण ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्या लोकांनी आपल्या आहारात मधाचा वापर हा खूप कमी प्रमाणात केला जातो. मधुमेहासाठी साखर हे पूर्ण वर्ज्य असावे लागते. त्याच्यासाठी मधाचा वापर हा जास्त प्रमाणात आहारात केला जात नाही. पण जरी मधुमेह असला तरी आपण कधी आपल्या शरीरासाठी मध खाऊ शकतो का ? हे आपण आज जाणून घेणार आहोत.
—- साखरेच्या तुलनेत मधामध्ये साखर आणि कार्बोहायड्रेटेडस कमी असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे लगेच खूप वाढत नाही त्यामुळे काही प्रमाणात मध खाल्ला तरी तो चालू शकतो.
— ज्यावेळी आपण साखर खातो. त्या साखरेच्या तुलनेत आपल्या शरीराला मध खाल्यानंतर कमी इन्सुलेशन तयार करावे लागते. म्हणून जास्त प्रमाणात न खाता कमी प्रमाणात मध खाल्ला तर तो आपल्या शरीराला फायदेशीर ठरू शकतो.
—- जर तुम्हाला मधुमेह आहे त्या वेळेस कमीत कमी प्रत्येक जेवणाच्या वेळी तुमच्या शरीरात ६०% कार्बोहायड्रेट्स गेलेच पाहिजेत. तर तुमचे शरीर इन्सुलेशन तयार करू शकेल.
— जर एखादा गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण झाली तर त्यावेळी साखर खाण्याऐवजी त्याच्यामध्ये मध हा खाल्ला जावा.
— मधामध्ये कॅलरीज चे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे सतत मधुमेही लोकांनी मध हा खाल्ला जाऊ नये.
— ज्यावेळी तुम्ही मधाचा आहारात वापर कराल त्या वेळी तुमच्या शरीरातील साखरेची पातळी सुद्धा मोजणे आवश्यक आहे.