Monsoon Nail Care – भाग 1 : पावसाळ्यात पायांच्या नखांचे आरोग्य धोक्यात आहे हे कसे ओळखालं..?; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Monsoon Nail Care) सध्या पावसाळा सुरु झाल्यामुळे सगळीकडे रोगराई आणि साथीचे आजार होण्याची भीती निर्माण झाली आहेत. अलीकडेच कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना पाहून प्रत्येकालाच धास्ती वाटू लागली आहे. आजारपण कुणालाच आवडत नई. पण पावसाळ्यात त्याला काही पर्याय नाही. पण एक आहे कि, आजार होऊ नये किंवा झाला तर त्वरित उपचार करणे यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करूच शकता. यासाठी घरातील स्त्रिया विविध प्रकारचे काढे आणि औषधी बनविताना दिसतात.
पण पावसाळ्यात फक्त साथीचे रोग आणि संसर्गाचीच भीती असते का..? तर नाही. याशिवाय त्वचेची आणि नखांची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण या दिवसात त्वचा आणि नखे यांवरही विशेष परिणाम होत असतो. प्रामुख्याने पायांची नखे फार जपावी लागतात. साचलेलं पाणी, ओली चप्पल, चिखल यामुळे पायाच्या नखांमध्ये संसर्ग होण्याची भीती असते. त्यात जर आधीपासूनच नखांना काही संसर्ग झाला असेल किंवा नखांमध्ये एखादी जखम झाली असेल तर फारच जपावे लागते. (Monsoon Nail Care)
अनेकदा आपल्याला असं वाटत कि पावसाळ्याच्या दिवसात फक्त माती, घाण आणि पाण्यामुळेच पायाच्या नखांचे आरोग्य बिघडते. पण मित्रांनो, याशिवाय अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे पायाच्या नखांचे आरोग्य धोक्यात येते. त्यात पावसाळा हे निमित्त मात्र. आधीच पावसात विविध आरोग्याच्या समस्यांना उधाण येत. त्यात आपण आता जाणून घेणार आहोत ती कारणे नखांचे आरोग्य बिघडविण्यात आणखीच भर घालतात. आज आपण भाग १ मध्ये पावसाळ्यात पायाच्या नखांचे आरोग्य बिघडवणारी कारणे तसेच संसर्गाची लक्षणे जाणून घेऊ. तर यानंतर भाग २ मध्ये आपण पायाच्या नखांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊ.
० पावसाळ्यात पायाच्या नखांना संसर्ग झाल्यास दिसणारी लक्षणे
(Monsoon Nail Care) आपल्या शरीरातील कोणताही लहान मोठा अवयव हा दुखावल्यास वा बाधित झाल्यास काही लक्षणे दिसून येतात. ती वेळीच समजल्यास त्यावर उपाय करणे सोपे जाते. चला तर जाणून घेऊ पावसाळ्यात पायाच्या नखांना संसर्ग झाल्याचे दर्शविणारे लक्षणे खालीलप्रमाणे:-
१) पायात ठणके मारणे/ वेदना होणे.
२) बोटांच्या नखांना इजा होणे.
३) बोटाची नखे पांढरी पडणे.
४) नखांमध्ये वेदना होणे आणि पुरळ येणे.
५) नखांमध्ये पाणी जाऊन पू तयार होणे.
६) पायाची नखे आपोआप तुटणे. (Monsoon Nail Care)
७) नखांचा रंग बदलणे.
८) नखांवर डाग दिसणे.
९) नखांना भेगा पडणे.
१०) नखांमधून सतत रक्त वा पाणी येणे.
११) नखांची आतील बाजू काळी, निळी होणे.
१२) नखांवर हिरवा थर साचणे.
० नखांचे आरोग्य बिघडण्याची कारणे (Monsoon Nail Care)
1. शारीरिक अस्वच्छता – पावसाळ्यात विविध मार्गे धूळ, माती आपल्या संपर्कात येत असते. त्यामुळे पावसात भिजलात किंवा नाही भिजलात तरीही घरी आल्यानंतर अंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक आहे. कारण शारीरिक अस्वच्छता देखील नखांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरू शकते. प्रामुख्याने हि भीती मातीतले खेळ खेळणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळते.
2. जड वस्तू पायावर पडणे – एखाद्या अपघातामध्ये वा अनावधानाने एखादी जड वस्तू पायावर पडली तर नखांचे नुकसान होते. थोडे दिवस नखांवर सूज दिसते पण त्यानंतर नख पूर्ववत होते. यामुळे आपण फारसे लक्ष देत नाही. पण यात नखांचे मोठे नुकसान होते. कारण बोटातील एखादी नस दुखावल्यास त्याचा नखांवर परिणाम होतो. नखं कमकुवत होतात आणि संसर्गाला वाट मोकळी होते. (Monsoon Nail Care)
3. चुकीची पादत्राणे – पावसाळ्यात पावसाळी चप्पल न वापरल्यास देखील पायाला आणि साहजिकच नखांना देखील त्रास होतो. यामुळे पायांना आणि नखांजवळील भागाला वेदना होतात. खूप घट्ट चप्पलमुळे सौम्य प्रकारच्या दुखण्यापासून ते जखमांपर्यंत त्रास होतात. यामुळे डेड नेलची समस्या होऊ शकते.
4. त्वचा विकार – (Monsoon Nail Care) जर तुम्हाला गंभीर प्रकारचा त्वचा विकार असेल तर पावसाळ्यात नखांमधून संसर्गाची भीती असते. कारण नखांमधील त्वचा हि आधीच नाजूक आणि त्रासलेली असते. ज्यामुळे कोणताही संसर्ग नखावाटे शरीरात प्रवेश करू शकतो.
5. नखांमधील जखमा – अनेकदा आपण नखं कापताना खूप जास्त कापतो आणि त्यामुळे जखमा होतात. पण त्या बऱ्याही होतात म्हणून दुर्लक्षित केल्या जातात आणि यानंतर पावसाळ्यात याचा त्रास होतो. पावलात बराच वेळ पाण्यात पाय राहिल्यास पायाच्या नखांना संसर्गाचा धोका निर्माण होतो. यात नखे काळी, निळी, हिरवी किंवा पांढरी पडू शकतात. (Monsoon Nail Care)
‘हे’ पण वाचा :-
Artificial Nails: रंगबेरंगी कृत्रिम नखे आरोग्याची लावतील वाट; जाणून घ्या दुष्परिणाम
वेळीच व्हा सावध!!! हाताची नखे देतात ‘या’ आजारांचे संकेत; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
कोणत्याही हानीशिवाय अस्वच्छ नखे कशी स्वच्छ करालं?; जाणून घ्या
लांब नखे दिसायला आकर्षक पण आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या