बाळाच्या आईने ‘या’ चुका टाळून त्याच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात सुखद घटना म्हणजे तिच्या बाळाचा जन्म. आई आपल्या बाळाची पूर्ण काळजी घेते. बाळाचे डोळेदेखील पूर्ण उघडलेले नसतात पण आईला त्याला काय हवंय हे बरोबर कळतं. आपल्या बाळाला भूक लागली आहे का? त्याच पोट भरलं का? बाळाला सर्दी झाली? अश्या प्रत्येक प्रश्नाचे आईकडे उत्तर असत. खरंतर मैत्रिणींनो आपल्याला असे वाटणे फार साहजिक असले तरीही यात कुठेतरी सत्यतेत फरक आहे. कारण आईला आपल्या बाळाच्या भुकेबद्दल माहित जरी असलं तरी नकळत काही चुका होण्याची शक्यता असते. जसे कि बाळाला कधी पाणी आणि कधी दूध पाजावे याबाबत निश्चित माहिती असणे गरजेचे आहे अन्यथा याचा बाळाच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. जाणून घ्या अश्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
पहिली चूक – बाळ सात, आठ महिन्याचे झाल्यानंतर त्यांना पूरक आहार सुरू करणे गरजेचे असते. मात्र अनेक स्त्रिया मुलं वर्षाची होईपर्यंत त्यांना दूध आणि पावडर मिल्कवर ठेवतात. यामुळे मूळ अशक्त होण्याची शक्यता असते.
दुसरी चूक – नोकरदार महिला काम आणि मुल अशा दोन जबाबदाऱ्या एकत्र पार पाडत असतात. दरम्यान सहा महिन्यांची कार्यालयीन सुट्टी संपल्यानंतर त्या बाळाला बाटलीच्या मदतीनं दूध पाजतात. यामुळेही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
तिसरी चूक – कामावर जात असल्यामुळे आपल्या मुलांना बाजारात उपलब्ध असलेलं पाकिटबंद अन्न सतत खाऊ घालणे. विदेशातून आयात केलेल्या डबाबंद आहाराचे काहीसे स्वस्तातील डबे मुलांसाठी वापरणे हि सगळ्यात मोठी चूक आहे.
चौथी चूक – बाळाला काहीही आणि कितीही प्रमाणात खाऊ घालायचं आणि झोपवायचं. नंतर त्याच्या हातात दुधाची बाटली द्यायची. हीदेखील एक गंभीर चूक आहे.
० बाळाचा योग्य आहार काय?
बाळाला खाण्यासाठी हलका, सहज पचणारा आणि चवदार असा आहार देणे योग्य आहे. यासाठी शिजवण्यास सोपा आणि साठवून ठेवता येणारा आहार असावा. या पूरक आहारात चवीमध्ये सारखेपणा नसेल याची काळजी घ्यावी.
तसेच टीव्हीमध्ये दाखवले जाणारे पदार्थ, आकर्षक पॅकमधील गोष्टी, महागडे पदार्थ याऐवजी बाळासाठी घरगुती, सात्विक, चांगलं आणि आरोग्यदायी काय आहे ते द्यावे. जसे कि- मऊ शिजलेल्या तांदळाचे विविध पदार्थ, दूध, दही, गूळ, मध, तूप.