मुलतानी मातीचे त्वचेसाठी असलेले फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन । मुलतानी माती हि आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या त्वचेसाठी फार लाभकारक आहे. त्याच्या वापराने आपल्या चेहऱ्याला सौदर्य हे प्राप्त होते. काही वर्षांपासून मुलतानी माती हि सौदर्यासाठी जास्त प्रमाणात वापरली जाते. मुलींच्या चेहऱ्यावर आलेल्या पुटकुळ्या या दूर करण्यासाठी तसेच चेहऱ्याचा रंग बदलण्यासाठी सुद्धा मुलतानी मातीचा वापर हा जास्त केला जात
मुलतानी माती याचे मोठे खडे उगाळून किंवा हल्ली त्याची पावडर देखील मिळते ती माती फेसपॅकसारखी लावता येते. या मातीतील घटकामुळे त्वचेवरील पुटकुळ्यामुळे पडलेले डाग तसेच वांग कमी होण्यास मदत होते. तसेच जर त्वचा तेलकट असेल तर त्वचेचा तेलकटपणा कमी करायला देखील उपयुक्त ठरते. हि माती फिकट पिवळसर रंगांची असते.ज्यांची त्वचा तेलकट आहे या त्यांच्यासाठी मुलतानी माती ही वरदान आहे. या प्रकारची त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी माती गुलाबपाणी, तुळशीची पाने किंवा रस गुलाबपाणी आणि एक चिमटी हळद हे एकत्र करून त्यात पेस्ट होईल इतकं पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि वाळल्यानंतर लगेच धुवून टाकावे.यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो आणि चेहऱ्याला नवीन तजेला मिळतो.हा पॅक कमीत कमी १५ दिवसातून एकदा लावले तरी चालू शकते.
काही काही वेळा आपल्या त्वचेला लावल्या जाणाऱ्या मुलतानी माती मध्ये बदाम आणि चंदन उगळून लावला जातो. त्यामुळे चंदन यामुळे त्वचा हि खूप भारी होते. दुधाच्या पॅक मुळे मुलतानी मातीला तेलकट पणा जास्त लाभत नाही. त्याच्यातील स्निग्धता हि मुलतानी मातीमुळे राखली जाते. कोरड्या त्वचेसाठी मुलतानी माती हि लाभकारक आहे. त्यामध्ये दूध ऐवजी साय घातल्यास उत्तम तसेच एक चिमूट चंदन पावडर घालावी यामुळे त्वचेतील रुक्षता कमी होऊन त्वचा तुकतुकीत होईल. त्वचेवरील डाग हे कमी होण्यासाठी मुलतानी माती हि लाभकारक आहे. आपल्या डोळयांच्या खालच्या काळ्या वर्तुळावर प्रभावी उपाय मुलतानी माती करते.