जीवनसत्वांचा खजिना असणाऱ्या गोड-गोड खरबूजाचे ‘हे’ आरोग्यवर्धक फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन : उन्हाळ्याचे दिवस आहेत, उष्णतेने अंगाची लाही लाही होत असताना शरीरासहित मनाला गारवा मिळावा असे प्रत्येकाला वाटत आहे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळवण्यासाठी या दिवसात बाजारात कलिंगड, खरबूज हि वेल वर्गीय फळे खरेदी करण्याचा कल दिसून येतो. त्यातूनही गोड आणि पिवळेधमक खरबूज पाहिल्यावर प्रत्येकाला ते पाहून खाण्याची इच्छा होते. खरबूजाचा रंग पिकल्यानंतर पिवळा होतो. खरबूजामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिज असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील उष्णता सुसह्य करण्याचे काम खरबूज करत असते. उन्हाळ्याच्या दिवसाता शरीराला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. उन्हात मोठ्या प्रमाणात घाम येत असल्याने घामावाटे पाणी शरीराबाहेर फेकले जाते. त्यामुळेच शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. यावेळी भरपूर पाणी पिण्यासोबतच पाण्याचा अधिकांश असलेल्या फळांचे सेवन करणे आवश्यक असते. या ऋतूत टरबूज खाणे शरीरासाठी हितकारक असते. टरबूजामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. यामुळे डिहायड्रेशन रोखता येते. यात तब्बल ९५ टक्के पाणी असते. यासोबतच व्हिटामिन आणि मिनरल्सही असतात. हे खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. प्रत्येक मोसमात हे फळ खाल्ले पाहिजे असे डॉक्टरांचे म्हणणे असते.
खरबूज खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.
- खरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज खाल्याने शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्यास मदत होते. खरबूज पचायला हलके असल्याने खरबूज खाल्याने अपचन होत नाही. खरबूज खाल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
- ज्यांना डायबेटीसचा त्रास आहे ते पण काही प्रमाणात खरबूज खाऊ शकतात कारण खरबूजामध्ये पाण्याचे प्रमाण 95% असते. आणि साखर मात्र 5% इतकी असते.
- खरबुजामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. खरबूज खाल्याने चेहरा निरोगी,टवटवीत राहतो.
- या व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिन असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदा होतो.
- नियमितपणे खरबूज खाल्ल्याने शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यात आढळणारे पौष्टिक घटक अनेक प्रकारच्या आजारांशी लढायला मदत करतात.
- खरबुजामध्ये एंडीनोसीन नावाचे तत्त्व असते. जे शरीरात रक्ताची गुठळया होऊ देत नाही. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याच्या नियमित खरबुजाचे सेवन केल्याने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.
- खरबुजाचे नियमित सेवन किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
- नियमितपणे खरबूज खाणाऱ्या माणसाच्या डोळ्यातील मोतीबिंदुचा धोका जवळजवळ चाळीस टक्क्यांनी कमी होतो.
- जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर टरबूज खाल्ल्याने हा त्रास दूर होतो.
- वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आपल्या रोजच्या आहारात खरबुजाचा समावेश अवश्य करा कारण खरबुजामध्ये कॅलरी कमी प्रमाणात आढळतात, तर फायबर जास्त असते. खरबुज खाल्ल्याने पोट भरलेले राहते. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.