घोरत असाल तर यावर नैसर्गिक उपाय
हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । घोरणे हि नैसर्गिक सवय असली तरी त्याचा त्रास हा आजूबाजूच्या लोकांना हा होतो. आजूबाजूला जी लोक झोपली असतील तर त्या लोकांना आपल्या घोरण्याने खूप प्रचंड प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे त्याची झोप मोड होते. दिवसभर काम करून थकून आल्यानंतर सुद्धा झोप पूर्ण झाली नाही तर मात्र चिडचिड होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपल्यामुळे इतरांना त्रास होत असेल तर लवकरात लवकर झोपण्याच्या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यावर कोणत्या पद्धतीने घरगुती उपाय करू शकता ते जाणून घेऊया …..
— पंखा किंवा एसी खाली झोपू नका .
— पंखा किंवा एसीची सरळ हवा लागल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. आणि त्यामुळे आपल्या श्वासनलिका आकसतात.
—- भरपूर पाणी प्या .
—- शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे नाक आणि गळ्यामध्ये कफ वाढतो. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. दिवसभर ३-४ लिटर पाणी प्या.
— योग करा घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी कपालभाति आणि प्राणायम फायदेशीर आहे.
—— आहारावर नियंत्रण ठेवा
—- रात्रीच्या वेळी जास्त खाणे टाळा. झोपण्याआधी कफ वाढवणारे पदार्थ जसे की दुध, ऑयली फूड, चॉकलेट किंवा गोड खाऊ नका.
—- रक्त दाबावर नियंत्रण ठेवा .
— वजन कमी करा.
—– लसूण मोहरीच्या तेलाने मालिश .
— मध प्या. रोज झोपण्याआधी एक चमचा मध प्यायल्याने गळ्याच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. घोरण्याची समस्या दूर होते.
—- मिठाच्या पाण्याने गुळण्या करा .
— थंड पदार्थ खाऊ नका .