Navratri Fasting Food – नवरात्रीचे व्रत करताना काय खावे आणि काय नाही..?; लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Navratri Fasting Food) सध्या संपूर्ण राज्यभरात आदिमायेच्या नवरात्र उत्सवाचा जंगी जल्लोष सुरु झाला आहे. अनेक भाविक या पावन प्रसंगी ९ दिवस उपवास करतात. काहीजण संपूर्ण ९ दिवस एक जेवणी उपवास म्हणजेच दिवसभरात फक्त एकदाच जेवून उपवास करतात. तर काही लोक नऊच्या नऊ दिवस कठोर व्रत करतात. अशावेळी अंगातील त्राण निघून जातो आणि आरोग्याच्या दृष्टीने पाहता आपले शरीर कमकुवत होऊ लागते. त्यामुळे जर तुम्हीही या काळात उपवास करत असाल तर श्रद्धेपलीकडे आपल्या आरोग्याची पूजा करायला विसरू नका.
आपले शरीर हे पंचतत्वांनी तयार झालेले असते. त्यामुळे स्वतःला पूर्ण उपाशी ठेवून आराधना करणे म्हणजे पंच तत्त्वांचा अपमान करण्यासारखे आहे. मात्र ज्याची त्याची श्रद्धा हाच काय तो शेवटचा पर्याय. (Navratri Fasting Food) म्हणूनच ९ दिवस उपवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजची बातमी अत्यंत आवश्यक आहे. अशा दिवसात काय खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते हे आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे. तसेच या व्रतादरम्यान काय खाल्ल्याने शरीराला नुकसान होऊ शकते हे देखील आपण जाणून घेऊ. चला तर जाणून घेऊया व्रत करताना काय खावे आणि काय नाही.. ते खालीलप्रमाणे :-
० ‘हे’ पदार्थ आवर्जून खा (Navratri Fasting Food)
१. पाणी – उपवासाच्या वेळी संपूर्ण दिवस पोट रिकामी असल्यामुळे शरीरातील पाणी हळूहळू कमी होऊ लागते. परिणामी आपले शरीर डिहायड्रेट होऊ लागते. ज्यामुळे पोट आणि त्वचा यांवर प्रामुख्याने प्रभाव पडतो. तसेच चक्कर येण्याची शक्यता असते. म्हणूनच शरीर हायड्रेट राहण्यासाठी शक्य तेवढे जास्त पाणी पिण्यावर भर द्या. (Navratri Fasting Food)
२. शहाळं – उपवासाच्या दिवसात नारळाचे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. कोणतेही व्रत करताना नैसर्गिक पदार्थांचे सेवन केले तर ते व्रत अधिक फलदायी सिद्ध होते. त्यामुळे शहाळं नारळाचं पाणी किंवा त्याची मलई खाणे फायदेशीर आहे. यामुळे शरीर डिहायड्रेट होत नाही आणि पोटदेखील भरल्यासारखे राहते.
३. लिंबू पाणी – (Navratri Fasting Food) लिंबू पाणी आपल्या शरीराला डिहायड्रेट होऊ देत नाहीच. शिवाय उपाशीपोटी लिंबू पाणी घेतल्याचा आणखी एक मोठा फायदा आहे. तो म्हणजे उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती चांगली होते. फक्त यासाठी लिंबू पाण्यात साखरेचा वापर करू नये.
४. फळे – कोणतेही उपवास सुरु असताना जास्तीत जास्त फळे खाणे चांगले. यामध्ये पाणीदार फळांचा जास्त समावेश असेल याची काळजी घ्या. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि एनर्जेटिक वाटते. शिवाय पाणीदार फळांमुळे डिहायड्रेशनचा धोका कमी असतो. यामध्ये सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब, जांभूळ अशी फळे खा.
५. फळांचा रस – काही लोकांना बरीच फळे आवडत नाहीत. काही निवडक फळांच्या बाबतीत त्यांचे मन तयार होते. अशा लोकांनी उपवासाच्या काळात त्यांना आवडणाऱ्या फळांचा रस पिणे फायदेशीर राहील. यामुळे त्यांचे पोटही भरेल आणि मनही दुखावणार नाही. (Navratri Fasting Food)
६. काकडी – काकडीमध्ये विविध प्रकारची जीवनसत्वे आणि मुळात पाण्याचा खूप साठा असतो. यामुळे उपवासाच्या दिवसात काकडीचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.
७. गाजर – (Navratri Fasting Food) गाजरामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे उपवासाच्या दिवसात गाजर खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जेने परिपूर्ण होते. शिवाय यातील पाणी तत्त्व शरीरातील डिहायड्रेशनची कमतरता दूर करते.
८. सुका मेवा – उपवासाच्या काळात अनेक कामे करताना ऊर्जेची आवश्यकता असते. ती टिकवण्यासाठी मूठभर ड्रायफ्रुट्स खा. यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अक्रोड यांचा समावेश करावा.
९. दुग्धजन्य पदार्थ – उपवासाच्या काळात आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्याने पोटाला भर मिळते. या पदार्थांमधील कॅल्शियम ऊर्जा देते आणि शरीरातील कमकुवतपणा दूर करते. यासाठी दूध, दही, पनीर, चीज, पांढरे लोणी, तूप, मलाई हे पदार्थ खा. (Navratri Fasting Food)
० ‘हे’ पदार्थ खाणे टाळा
१. फास्ट फूड आणि पॅकेज्ड फूड – उपवासाच्या काळात कोणतेही फास्ट फूड किंवा पॅकेज्ड फूड खाणे शरीरास बाधा निर्माण करू शकते. हे पदार्थ टिकवण्यासाठी वापरले जाणारे घातक पदार्थ पोटाचे आरोग्य खराब करू शकते.
२. कांदा किंवा लसूण – (Navratri Fasting Food) नवरात्रीच्या उपवासात कांदा आणि लसूण हे पदार्थ वर्ज्य करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे पदार्थ न खाणे उत्तम. वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचे झाले तर कांदा आणि लसूण दोन्ही पदार्थ उष्ण असल्यामुळे हे रिकामी पोटाला बाधक ठरू शकतात.
३. कोणत्याही प्रकारच्या शेंगा – कोणत्याही प्रकारच्या शेंगा उपाशी पोटी खाल्ल्यामुळे पित्त आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. यामध्ये भुईमूग, वाल यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
४. मसूर – काही भागात मसूर मांसाहारात धरले जातात. त्यामुळे नवरात्रीत मसूर खाऊ नये.
५. तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ आणि कॉर्नफ्लोअर – यांपैकी कोणतेही पीठ नवरात्रीत खाणे योग्य मानले जात नाही. (Navratri Fasting Food)
६. रवा – नवरात्रीच्या उपवासात रव्याचेही सेवन केले जात नाही. काही भागांमध्ये प्रसादासाठी देखील रवा खाल्ला जात नाही.
७. कोल्डड्रिंक – कोल्डड्रिंकमधील हानिकारक रासायनिक घटक हे पोटातील आतड्यांचे आरोग्य बिघडवू शकतात. त्यामुळे उपवासादरम्यान कोल्ड ड्रिंकचे सेवन करू नये.
८. मांसाहार – (Navratri Fasting Food) नवरात्र तसेच अन्य कोणत्याही दैवी उत्सवामध्ये मांसाहार करू नये. या दिवसात ते वर्ज्य आहे.
९. मद्य आणि स्मोकिंग – नवरात्र तसेच अन्य कोणत्याही दैवी उत्सवामध्ये या कृती राक्षसी मानल्या जातात. त्यामुळे या दिवसात ते वर्ज्य आहे. (Navratri Fasting Food)
‘हे’ पण वाचा :-
उपवास आहे पण काय खावं कळत नाही?; लगेच जाणून घ्या
उपवासाच्या दिवशीही एनर्जेटिक राहायचंय? मग रताळ्याचा किस जरूर खा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
उपवास करत असाल तर फळाहार जरूर करा.. कारण; जाणून घ्या
Benefits Of Lemon Water: कोमट पाण्यातून लिंबाचे सेवन करा आणि अमृतासमान फायदे मिळवा; जाणून घ्या
फळं खाण्याचे नियम पाळा, अन्यथा आरोग्यदायी फळे करतील शरीराचे नुकसान; जाणून घ्या
Healthy Fruits : ‘हि’ फळे खालं तर, पोटाच्या तक्रारी राहतील दूर; जाणून घ्या