कोरोनाची दुसरी लाट नव्हे तर त्सुनामी!!! कधी ओसरणार
हॅलो आरोग्य ऑनलाईन । जगभरात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक लाखोच्या संख्येनं कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच आता ही रुग्णसंख्या वाढ सर्व स्तरांवर दहशतीचं वातावरण निर्माण करु लागली आहे. आपल्या देशापुरते बोलायचे झाल्यास तर मृत्यूचा आकडा आता रोज हजारोंच्या घरात पोहचला आहे. लसीकरण वेगात चालू आहे. कोरोना विषाणूचा शरीरावर किती काळ प्रभाव राहतो याबद्दल अद्याप खात्रीशीर असे काहीही माहिती नाही. हा विषाणू वेळोवेळी स्वतः मध्ये बदल करत आहे. कोरोना विषाणूमुळे बरे झाल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती किती काळ टिकते हे देखील समोर आलेले नाही. या व्यतिरिक्त, बरे झाल्यानंतर पुन्हा संक्रमण होण्याचा किती धोका आहे यावरही संशोधन सुरु आहे.
दुसरी लाट म्हणजे काय, आणि ती कधी ओसरणार?
सामान्य भाषेत कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थ असा की, रुग्णांची संख्या कमी होत असताना अचानक पुन्हा संक्रमण वाढणे. अमेरिकेत कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत असताना, बर्याच देशांमध्ये मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहेत. हे कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अंत होत असल्याचं सूचित करतो. जेव्हा संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढते तेव्हा त्याला दुसरी लाट म्हणता येईल. डब्ल्यूएचओनेही कोरोनाच्या दुसर्या लाटेचा इशारा दिला होता. हा रोग जितका जास्त काळ टिकेल तितक्या त्याच्या लाटा वाढत जातील. कोरोना विषाणूचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. कोरोनाचा प्रसार भारतात बर्याच राज्यात एकत्र झाला नाही. लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगही वेगवेगळ्या टप्प्यावर केले गेले. काही आरोग्य तज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जर संपूर्ण नियोजन करून लॉकडाउन हटविले गेले नाही आणि लोक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रवास करत राहिले तर कोरोना विषाणूचा पुन्हा प्रसार होऊ शकतो आणि लवकरच त्याची दुसरी आणि तिसरी लाट येऊ शकते.
भारतात प्रवास करण्यासाठी आणि आपल्या राज्यात जाण्यासाठी परवानगी दिली गेल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसर्या वेव्हमध्ये एकाच वेळी बर्याच गोष्टी असू शकतात, त्याचा उद्रेक काही विचित्र मार्गाने होऊ शकतो. कोरोनाची दुसरी लाट आल्यास, त्याचा प्रसार लोक किती सामाजिक अंतर पाळतात आणि मास्क वापरतात यावर अवलंबून असेल. या व्यतिरिक्त, ते कोरोनाच्या चाचणीवर देखील अवलंबून असेल. 80 टक्के लोकं सार्वजनिक ठिकाणी जर मास्क वापरतील तर कोरोनाचा संसर्ग 8 टक्क्यांनी कमी होईल.
या स्थितिमध्ये एक अत्यंक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. की जितक्या वेगानं कोरोनाची दुसरी लाट देशात पसरली आहे तितक्याच वेगानं ही लाट ओसण्याचीही दाट शक्यता आहे. नुकतंच Credit Suisse नं केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. सदर संशोधनानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस भारतीय लोकसंख्येतील 40 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असतील. मागील वर्षी डिसेंबर महिना अखेरीस देशातील 21 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या होत्या. एप्रिल अखेरीस हे प्रमाण वाढत जाऊन यामध्ये आणखी 7 टक्क्यांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या लसीकरण मोहिमेमुळे आतापर्यंत जवळपास 12 टक्के जनतेमध्ये कोरोनाशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती विकसीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं देशातील 40 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या धोक्यापासून दूर असेल.
हे करायला अजिबात विसरू नका
– चांगल्या दर्जाच्या मास्कचा वापर करा, एक पर्यायी मास्क नेहमी जवळ ठेवा. तो स्वच्छ असावा.
– नेहमी तोंड व नाक झाकले जाईल असा पद्धतीने मास्क वापरा
– सेनिटायझरचा वारंवार वापर करा व नेहमी जवळ बाळगा.
– हात हँड वॉश किंवा अॅंटी बॅक्टीरियल साबणाने व्यवस्थित धुवा
– सोशल डिस्टन्स जाणीवपूर्वक पाळा
– गर्दीची ठिकाणे टाळा.
-‘मला काही होत नाही’ ही वृत्ती सोडा
-ऑनलाईन पेमेंट चा वापर करा.
-आवश्यक असेल तरच घर सोडा.
-लहानमुले, गरोदरस्त्रिया, वयस्कर आजी आजोबा यांची विशेष काळजी घ्या.