ओंकार’चा करतील नियमित उच्चार, तर तुमची मुलं होतील हुश्शार; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। ओंकार हा एक ध्वनी संस्कार आहे. हा निव्वळ उच्चार नसून हा एक परिपूर्ण ध्वनी आहे. असे पुराणात म्हटले आहे कि, जेव्हा जीवसृष्टी निर्माण झाली तेव्हा सर्वात आधी उत्पत्ती झालेला पहिला ध्वनी म्हणजे ओंकार. हिंदू धर्मशास्त्रामध्ये या ओंकाराच्या ध्वनी उच्चरणास या अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे हिंदू धर्मातीत कोणतेही वेद, ऋचा वा मंत्र ओंकाराच्या उच्चारणाशिवाय पूर्ण होत नाहीत. मात्र ओंकाराच्या उच्चारांचे केवळ एवढेच महत्व नसून याचे आरोग्यविषयक महत्व देखील आहे. ओंकाराच्या नियमित उच्चाराने शारीरिक दृष्ट्या अनेक फायदे होतात. विशेष करून ओंकार’चा उच्चार मुलांच्या बौद्धिक क्षमतेस चालना देते.
आपली मुलं हुशार असावीत असे कुणाला वाटत नाही? वर्गात आपल्या मुलांचा पहिला नंबर यावा असे कोणत्या पालकांना वाटत नाही? याशिवाय खेळ, कला आणि इतर गोष्टींमध्ये मुलांची कुशलता असावी असे कोणत्या पालकांना वाटत नाही? वाटत ना? मग त्यासाठी मुलांची एकाग्रता टिकावी यासाठी मुलांना मदत करा. आता मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना मदत कशी कराल. तर मुलांना नियमित ओंकाराचे ध्यान करायला लावा.
मुलं ध्यानधारणा करायला नेहमीच कंटाळा करतात पण तुम्ही कंटाळा करू नका. नियमित मुलांसह ओंकाराचे उच्चारण करा. यामुळे तुमचेही मन शांत राहील आणि मुलही नियमित ध्यान केल्यामुळे निरोगी राहतील. सध्या लहान मुलांमध्ये मानसिक आजार वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. याचे कारण म्हणजे, खराब जीवनशैलीमुळे, हार्मोनल असंतुलन, साथीदारांचा दबाव आणि अभ्यासाचा ताण. या प्रत्येक गोष्टीमुळे मुले मानसिकरित्या अस्वस्थ होतात. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठीही ओंकाराचे ध्यान करणे फायदेशीर आहे.
० ओंकार’चा उच्चार कसा करावा?
हा उच्चार एक पूर्ण योग आहे. यामुळे मन शांत होत. शिवाय हळूहळू एकाग्रता वाढते. या फायद्यांसाठी, मुलांना ओंकार’चे उच्चारण शिकवले पाहिज. यासाठी काय करावे ते जाणून घ्या.
– मुलांना रोज सकाळी थोडा वेळ योगाभ्यासात बसायला सांगा.
– उगवत्या सूर्याकडे तोंड करून बसवण्याचा प्रयत्न करा.
– यानंतर मुलांना ओम उच्चार करायला लावा.
– हळू हळू या आवाजात ध्यान करण्यास सांगा. यानंतर मोठ्या आवाजात जा.
– मुलांना पूर्ण श्वास घ्यायला सांगा.
– आता श्वास हळू हळू सोडत ओंकाराचे उच्चारण करायला लावा.
– दरम्यान एक सकारात्मक कंपन तयार झाल्यास शरीर आणि मन दोन्ही शांत राहील.
लहान मुलांनी नियमित ओंकार’चे उच्चारण केल्यास होणारे फायदे
1. नियमित ओंकार’च्या उच्चारणामुळे मुलांमध्ये सजगता निर्माण होते.
2. मुलांमधील आत्मविश्वास वाढीस लागतो.
3. मुलांमधील एकाग्रता वाढते.
4. मुलांच्या मेंदूवरील ताण कमी होतो.
5. मुलांचे अस्थिर मन शांत होते.
6. मुलांच्या कल्पना शक्तीस चालना मिळते.
7. कोणत्याही आव्हानात्मक क्षणांमध्ये मुलं स्वतःला हाताळण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम होतात.
8. जितक्या लहान वयात मुलं हे ध्यान करतीय तितक्या लवकर त्यांच्यात मानसिक आणि भावनिक लवचिकता विकसित होईल.