भाग 1: उन्हाळ्यात सुती कापड वापरण्याचा आरोग्याशी काय संबंध?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या वातावरणातील बदल हेच सांगतोय कि हिवाळा जाऊन उन्हाळा आलाय. त्यामुळे आता आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण उन्हाळा असा ऋतू आहे जो शरीराचे आतून आणि बाहेरूनही नुकसान करतो. अशावेळी करायचे काय..? आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही ना काही तर करायला हवेच ना..? मित्रांनो खास उन्हाळ्याच्या दिवसात कितीतरी लोकांनी सुती कापड परिधान केल्याचे तुम्ही पाहिले असेल. याशिवाय कितीतरी जणांनी तुम्हाला सल्ला देखील दिला असेल कि, उन्हाळा सुरु झालाय आता कॉटन कपडे वापर.
तर तुम्हाला या सल्ल्यांमागचे कारण माहित आहे का..? शिवाय तुम्हाला कधी असा प्रश्न पडला नाही कि सुती कापडाचा आरोग्याशी काय संबंध असेल..? आणि बर असेल संबंध तर उन्हाळ्यातच का..? जर तुम्हीही या प्रश्नांची उत्तरं शोधत असाल तर वेळ न घालवता हि माहिती पूर्ण वाचा. कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुती कपडे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तो कसा हे आपण भाग १ मध्ये जाणून घेणार आहोत.
० सुती कापड आणि आरोग्याचा संबंध
सुती कापडामध्ये नैसर्गिकयुक्त फायबर मोठ्या प्रमाणात असते. नैसर्गिक फायबरचे कपडे हे मुळातच त्यातील औषधी गुणांमुळे फायदेशीर असतात. हे कपडे एखाद्या प्रभावी आणि परिणामकारक औषधीसारखेच काम करतात. कारण निसर्गाकडून म्हणचेज झाडं, किडे यांच्या माध्यमातून जे धागे तयार होतात आणि त्यातून पुढे त्याच धाग्यांपासून कापड तयार होणे याला ‘नैसर्गिक फायबर’ म्हणतात.
कापसापासून सुती कपडे, अळशीच्या झाडापासून लिननचे कपडे आणि रेशमच्या किड्यांपासून रेशमाचे किंवा सिल्कचे कपडे तयार करण्यासाठी लागणारा धागा तयार केला जातो. अर्थातच हे सर्व कापड नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले असते. त्यामुळे यापैकी कोणत्याही कापडामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. तसेच याचा तुमच्या त्वचेवरदेखील कोणताही दुष्परिणाम होत नाही.
० सुती कापड आरोग्यदायी
सुती कापडाची निर्मिती हि नैसर्गिकरित्या होते. कारण हे कापड कापसापासून तयार होते. कापूस मुळातच स्वभावाने खूप मुलायम आणि आरामदायी असतो. कापसाचा मुलायमपणा हातांना स्पष्टपणे जाणवतो त्यामुळे हे कापड खरेदी करताना हातात घेऊन पहा.
सुती कापड हायपोलेरगेनिक आहे. त्यामुळे सुती कापड परिधान केल्यास त्वचेचे गरम हवेपासून रक्षण होते. कारण त्वचेतील आर्द्रता कायम राखण्यात सुती कापड मोठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
अनेक वर्षांपासून लोक सुती कापडाचे कपडे परिधान करत आहेत. त्यामुळे घरातील वृद्ध व्यक्ती सांगतात की, सुती कपडे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला गारवा देण्याचे आणि थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उब देण्याचे काम करतात. एका संशोधनात हे सिद्ध देखील झाले आहे.
आपले शरीर आणि ऋतुमान यामध्ये सामंजस्य ठेवण्याचे काम सुती कपडे करत असतात. त्यामुळे सुती कापड परिधान केल्याने आरामपणा जाणवतो.