Summer
| | |

भाग 2 : उन्हाळ्यात सुती कपडे परिधान करण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। उन्हाळ्यात हाय गर्मी असा अंतःकरणातून आवाज येतो. याचे कारण म्हणजे उन्हाचे चटके फक्त बाह्यांगाला नव्हे तर आंतरक्रियांना देखील प्रभावित करत असतात. अशावेळी सुती कापड परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण आपण भाग १ मध्ये जाणून घेतले. ते कारण म्हणजे सुती कापड नैसर्गिकरित्या तयार केल्यामुळे याचा शरीरासाठी आरोग्यदायी लाभ होतो. यानंतर आता नेमके काय आरोग्यदायी फायदे होतात ते भाग २ मध्ये जाणून घेणार आहोत.

1. उष्णतारोधक
नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या धाग्यांपासून बनविलेले सुती कपडे हे उष्णतारोधक असतात. त्यामुळे जेव्हा तापमान असह्य होते तेव्हा हे कपडे बाहेरच्या वाढत्या तापमानापासून शरीराला पूर्णपणे वाचविण्याचे काम करतात. तसेच धुतल्यानंतर या कपड्यांची नैसर्गिक गुणवत्ता कमी होत नाही. त्यामुळे सुती कापड दैनंदिन आयुष्यात वापरणे नक्कीच फायदेशीर आहे.

Immunity

2. संसर्गापासून बचाव
सुती कपडे नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले असतात त्यामुळे यात कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर नसतो. परिणामी त्वचेला कोणताही त्रास नाही आणि मुळात रॅशेस वा ॲलर्जीची शक्यता कमी होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टी-शर्ट, बनियान, अंडरवेअर, रुमाल, गमछा हे सुती कापड मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

3. क्षार रोधक
सुती कापड क्षार रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे मानले जाते. आपल्या शरीरातील घाम वाळविण्याचे वा शोषून घेण्याचे काम सुती कपडे अगदी सहज करत असतात. त्यामुळे इतर कोणतेही कपडे जे काम करू शकत नाही ते काम करण्यासाठी सुती कापड फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. कारण हे कपडे किटाणू शोधनासाठी देखील अनुकूल आहेत.

4. त्वचेत ओलावा राहतो
तीव्र तापमानात त्वचा कोरडी पडते. यामुळे त्वचेचे विकार होतात. मात्र सुती कपड्यांमधून हवा खेळती राहते आणि यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. परिणामी उन्हाळ्यात या कपड्यांमुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचेचे नुकसान होत नाही.