भाग 2: शरीरातील ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता भरून काढण्यासाठी काय करावे?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन । व्हिटॅमिन D हे फॅट सोल्युबल सेकोस्टेरॉईड आहे. हे व्हिटॅमिन शरीरात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम असे घटक पुरवण्यासाठी मदत करते. त्यामुळे आपल्या शरीरात ‘व्हिटॅमिन D’ची मात्रा योग्य प्रमाणात नसेल तर आपल्याला अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. व्हिटॅमिन D’च्या कमतरतेमुळे आपले शरीर अनेक व्याधी आणि आजारांचे घर होऊ शकते. मुख्य म्हणजे व्हिटॅमिन D हाडांच्या मेटाबॉलिज्मसाठी आवश्यक आहे आणि तेच मिळाले नाही तर कसे चालेल..? शिवाय व्हिटॅमिन D हे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे जे अन्नातून शरीरात जाऊन तयार होते. त्यामुळे आहारात आणि जीवनशैलीत थोडासा आवश्यक तो बदल केल्यास शरीरातील व्हिटॅमिन D ची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. आपण भाग १ मध्ये शरीरात व्हिटॅमिन D’च्या कमतरतेची लक्षणे जाणून घेतली. यानंतर आता भाग २ मध्ये आपण हि कमतरता भरून काढण्याचे उपाय जाणून घेणार आहोत.