Dizziness
| | |

भाग 2: चक्कर येण्याच्या समस्येवर सोप्पे उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून या दिवसात प्रामुख्याने चक्कर येण्याची समस्या अधिक लोकांना त्रास देते. शिवाय बराच वेळ उपाशी राहणे यामुळेही चक्कर येते. चक्कर आली म्हणजे कुठला तरी मेंदूचा विकार झाला असेल असे काही गरजेचे नाही. तर चक्कर येण्याची अनेक विविध कारणे असू शकतात. मात्र वारंवार चक्‍कर येत असेल तर डॉक्टरांकडून एकदा तपासणी जरूर करून घ्या. कारण चक्‍कर कोणत्या कारणामुळे आली हे समजल्यास त्यावर उपचार करणे सोप्पे जाते. भाग १ मध्ये आपण चक्कर म्हणजे काय..? त्याची कारणे आणि लक्षणे कोणती हे जाणून घेतले. यानंतर आता भाग २ मध्ये आपण चक्कर आल्यास काय उपाय करावे हे जाणून घेऊ. खालीलप्रमाणे:-

Dizziness

० चक्कर आल्यास करा ‘हे’ उपाय

१) कडक उन्हामुळे भोवळ आल्यास नाकात दुर्वांच्या रसाचे थेंब टाका. तसेच टाळूवर आवळकाठीच्या चूर्णात पाणी मिसळून तयार केलेला लेप लावून ठेवा. असे केल्यास आराम मिळेल.

Summer

२) अशक्तपणामुळे चक्‍कर येत असल्यास मनुका तोंडात टाकून चघळा. तसेच नियमित वरचेवर जर चक्कर येत असेल तर नियमित मनुका थोडेसे सैंधव मीठ लावून थोड्याशा तुपावर परतून घ्या आणि खा. बराच फरक पडेल.

३) तीव्र तापामुळे चक्‍कर येत असल्यास कपाळावर रिठ्याच्या पाण्याच्या घड्या ठेवा. तसेच यामुळे ताप उतरण्यासही मदत मिळते.

४) जुनाट सर्दी डोक्‍यात साठून राहिली तर डोके जड होऊन चक्‍कर येऊ शकते. अशावेळी सुंठीचे बारीक चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारे ओढा. आराम मिळेल.

५) पित्त वाढल्यामुळे चक्‍कर येत असेल तर ताज्या आवळ्याचा ४ चमचे रस आणि त्यात १ चमचाभर खडीसाखर मिसळून खा. यामुळे बरे वाटेल.

६) रक्‍तदाब कमी झाल्याने चक्‍कर येत असल्यास आल्याचा १ चमचाभर रस आणि १ चमचा मध असे मिश्रण थोडे थोडे चाटण असल्याप्रमाणे खा. यामुळे चक्कर येण्याची समस्या निघून जाईल.

७) मानसिक क्षोभामुळे वा मानसिक अस्वस्थतेमुळे चक्‍कर आल्यास कोहळ्याचा ४ चमचे रस आणि १ चमचाभर खडीसाखर असे मिश्रण खा. त्वरित आराम मिळेल.

८) कोणत्याही कारणाने शुक्रक्षय (हस्तमैथुन, अतिमैथुन, स्वप्नदोष वगैरेमुळे) झाल्यास चक्‍कर येत असेल तर, दररोज अर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे वाटून त्यातून निघालेले दूध चवीनुसार साखर टाकून प्या.