वयाचे ५५ वर्षे गाठलेल्या लोकांनी या कृती अजिबात नका करू
हॅलो आरोग्य ऑनलाईन । वय जास्त झाले कि , त्यानंतरच्या काळात आरोग्याच्या समस्या या वाढतच जातात. आरोग्य हे बिघडत जाते. त्यावर कितीही इलाज केले तरी एका ठराविक दिवसानंतर तो त्रास हा जास्त जाणवू लागतोच . वय वाढत गेले कि , काही गोष्टींचा त्रास हा वाढतच जातो. त्यामुळे शरीराच्या हालचाली या काही प्रमाणात मर्यादित ठेवल्या गेल्या पाहिजेत. काही कृती करण्याचा अट्टाहास टाळला गेला पाहिजे.
— जीने चढू नका, गरजच असेल तर आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे. आधाराची गरज हि असते.
— आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.त्यामुळे चक्कर येऊ शकते.
— आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा. अचानक आपल्या शरीराला दिलेल्या ताणामुळे शरीराला त्रास हा होऊ शकतो.
— आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला. त्यामुळे तोल जाऊन पडू शकता.
— झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा. कारण अचानक उठल्याने पाठीला इजा होऊ शकते.
— उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.
— खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.
— झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.
— संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या.
— वरचेवर मित्रांच्या, मैत्रीच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा