Post Workout Breakfast
| | |

Post Workout Breakfast – व्यायामानंतर खच्चून भूक लागली तर ‘हे’ पदार्थ खा म्हणजे वेटलॉस होईल पटापट; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| (Post Workout Breakfast) नियमित सकाळी नित्य नियमाने व्यायाम करण्याची सवय ही निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज दिवसातील किमान ३० मिनिटे व्यायाम करा असा सल्ला तज्ञ देतात. त्यात जर रोज सकाळी व्यायाम करण्याची सवय लावून घेतली तर दिवस उत्साही जातो. शिवाय कामाचा ताण जाणवत नाही. इतकेच काय तर चिडचिड देखील होत नाही. आजकाल वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक लोक हैराण आहेत जे फिटनेसकडे बारकाईने लक्ष देतात. त्यामुळे नियमित व्यायाम करण्याला हळूहळू लोक प्राधान्य देत आहेत.

व्यायाम केल्यानंतर खूप भूक लागते. जर तुम्हीही नियमित स्वरूपात व्यायाम करत असाल तर तुम्ही ही गोष्ट जरूर अनुभवली असेल. अशावेळी लवकर काहीतरी खायला द्या अस वाटत. पण व्यायाम करून बर्न केलेल्या कॅलरी वाढतील असे कोणतेही पदार्थ व्यायमानंतर खाऊ नये. (Post Workout Breakfast) अन्यथा वजन कमी करायचं सोडाच .. उलट आणखीच वाढेल. बरेच लोक रोज व्यायाम तर करतात पण त्यांना व्यायामानंतर काय खायचं..? तेच कळत नाही. मग अशावेळी जर तुमच्याकडून चुकीचं आहार सेवन केला गेला तर तुम्ही गाळलेल्या घामाचे मोल शून्य होईल. म्हणूनच आज आपण त्या पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत जे व्यायामानंतर लागणारी भूक मिटवतात. शिवाय वजन कमी होण्यासाठी मदत करतात.

Exercise

व्यायामानंतर लागलेली भूक योग्य पदार्थांचे सेवन करून शमवली नाही. तर साहजिकच आपण काय समोर येईल ते खाणार आणि वजन वाढण्यासाठी प्रोत्साहन देणार. अनेकदा या भुकेच कारण म्हणजे, रात्री लवकर जेवण झालेले असते किंवा सकाळी आपण खूप लवकर उठलेले असतो. (Post Workout Breakfast) यामुळे झोपेचे आणि आहाराचे योग्य गणित बसलेले असते. ज्यामुळे पोट चांगले साफ होते. परिणामी पोटात भुकेने खड्डा पडलेला असतो आणि भरपूर व्यायाम झाल्यामुळे उरली सुरली शारीरिक ऊर्जा वापरली जाते. यामुळे व्यायामाहून आल्या आल्या खच्चून भूक लागते.

आता उरला प्रश्न व्यायामानंतर काय खावे..? तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. कारण खूप व्यायाम करून घाम गाळून वजन कमी करायचं आणि मग काय..? चुकीचं काहीतरी खाऊन पुन्हा वजन वाढवायचं. तर हि चूक होऊ नये म्हणून भुकेला पर्याय जाणून घेऊ.

० व्यायामानंतर ‘हे’ पदार्थ खा (Post Workout Breakfast)

1. फळं – फळं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपण जाणतोच. त्यामुळे फळांचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जीवनात फार महत्व आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर अंथरुणातच चहा, कॉफी पिण्याच्या जीवघेण्या सवयींपेक्षा फळं खाणं केव्हाही चांगलच. फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचा समावेश असतो. यामुळे फळांमधील साखर आरोग्याला हानी पोहचवत नाही. शिवाय फळांमधील इतर गुणधर्म शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. फळे खाल्ल्यामुळे पोट भरले जाते. परिणामी इतर कोणतेही पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात आणि वजन वाढण्याची शक्यता कमी होते.

Fruits

(Post Workout Breakfast) मुळात फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमाण फार मोठ्या मात्रेत असते. यामुळे फळे आरोग्यासाठी अतिशय चांगली. प्रोटीन आणि अँटी ऑक्सिडंटसचे प्रमाण फळांमध्ये चांगले असल्याने पोट साफ होण्यासाठी फळं फायदेशीर भूमिका निभावतात. तसेच जर व्यायामानंतर लागलेली भूक शमवायची असेल आणि वजन वाढून द्यायचे नसेल तर फळे खा.

2. सुकामेवा – सुकामेव्यामध्ये विविध फळांचा समावेश असतो. जसे कि काजू, खजूर, अंजीर, बदाम. यामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅटस असतात. जे शरीरासाठी लाभदायक असतात. आपले शरीर मजबूत बनवण्यासाठी हेल्दी फॅट्स आवश्यक आहेत. व्यायामामुळे शरीराची बरीच ऊर्जा खर्ची होते. हि पुन्हा मिळवण्यासाठी असा आहार आवश्यक असतो.

DryFruits

(Post Workout Breakfast) म्हणूनच व्यायामानंतर लागलेल्या भूकेवर पर्याय म्हणून सुकामेवा खाणे कधीही फायदेशीर आहे. यामुळे पचनशक्तीदेखील चांगली राहण्यास मदत होते. शिवाय वजनसुद्धा वेगाने कमी होण्यास मदत होते. 

3. स्प्राऊट्स (मोड आलेली कडधान्ये) – मोड आणलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अन्य कोटण्याही भाज्यांपेक्षा जास्त प्रमाणात असते. कारण कडधान्यांना मोड आणल्यावर ते पचायला हलके होतात. दरम्यान व्यायामामुळे आपली शारीरिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्च झालेली असते. यामुळे शरीराला उर्जेसह प्रोटीन्सचीदेखील आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते.

Sprouts

(Post Workout Breakfast) म्हणूनच दिवसातील पहिले खाणे अर्थात व्यायामानंतर केला जाणारा नाश्ता हा प्रोटीन्सयुक्त असावा याची काळजी घ्या. मोड आलेली कडधान्ये फक्त उकडून, भाजून, उसळ करुन किंवा मिसळीसारखी खाणे फायदेशीर आहे.

4. ओटस – वजन कमी करण्यासाठी खाल्ले जाणारे ओटस अतिशय पोषणदायी आहार आहे. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. व्यायामामुळे लागलेली भूक घालवण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी ओटस खाणे कधीही उत्तम.

Oats

ओटसमुळे बराच काळ भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. मुख्य म्हणजे व्यायामानंतर भूक लागली तर ओटसमध्ये फळे, ड्रायफ्रूटस, दूध, मध असे पोषणदायी पदार्थ मिसळा आणि खा. यामुळे शारीरिक ऊर्जा वाढते आणि इम्युनिटी मजबूत होते. (Post Workout Breakfast).

‘हे’ पण वाचा :-

Dry Fruits: उन्हाळ्यात ड्राय फ्रूटचे सेवन कसे करालं..?; जाणून घ्या

Without Peeling Fruits: ‘हि’ फळं सोलून खाताय..? तर लगेच थांबा; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Healthy Fruits : ‘हि’ फळे खालं तर, पोटाच्या तक्रारी राहतील दूर; जाणून घ्या

Daily Protein Requirements: आपल्या शरीराला नियमित किती प्रथिने आवश्यक आहेत..?; जाणून घ्या

Walking After Meals Benefits : नियमित जेवणानंतर ‘हे’ काम करा आणि लठ्ठपणा दूर करा; जाणून घ्या