Anjaneyasana
| | |

फुफ्फुसाच्या निरोगी कार्यक्षमतेसाठी ‘या’ अद्भुत योगासनाचा सराव करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आहार आणि विहार उत्तम असेल तर आरोग्याची चिंता करावी लागत नाही. मात्र दोन्ही चुकीच्या पद्धतीने सुरु राहिले तर हि बाब गंभीर ठरू शकते. कारण आपण काय खातो आणि कसे जगतो याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अर्थात आपल्या इंद्रियांवर आणि अवयवांवर आपल्या हालचालींचा प्रभाव पडत असतो. यात चुकीच्या जीवनशैलीसोबतच प्रदूषणामुळे हृदय, फुफ्फुसे आणि किडनी हे अवयव हळूहळू बाधित होत जातात. परिणामी विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळीच आपल्या जीवनशैलीत सुधार आणा. दरम्यान काही लोकांना व्यसने त्रासदायक ठरतात. तर काही लोकांना फिटनेसची अधिक आवड बाधते. चुकीची आहार पद्धती, व्यसने, प्रदूषण आणि अधिक श्रम आपल्या फुफ्फुसांना अकार्यक्षम बनवितात. परिणामी श्वसनाचे त्रास संभवतात. दरम्यान उत्तम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे ठरते.

Anjaneyasana

आहार आणि उपचार यापलीकडे शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक उत्तम पद्धत म्हणजे योगासनांचा सर्व करणे. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तसेच फुफ्फुसाचे कार्य सुधारण्यासाठी योगाभ्यासात एका अद्भुत योग्य आसनाचा समावेश आहे. या आसनाचे नाव आहे अंजनेयासन. जर तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल आणि तुमची फुफ्फुसाची क्षमता सुधारायची असेल तर अंजनेयासनाचा सराव जरूर करा. चला तर जाणून घेऊया अंजनायासनाच्या सरावाची पद्धत आणि फायदे.

अंजनेयासन करण्याच्या स्टेप्स :-

स्टेप १: सर्वप्रथम योगा चटईवर वज्रासनात बसा.
स्टेप २: आता डावा पाय मागे घ्या आणि उजवा पाय जमिनीवर ठेवा.
स्टेप ३: यानंतर दोन्ही हात डोक्यावर घ्या आणि त्यांना एकत्र करा.
स्टेप ४: यानंतर हळू हळू मागे वाकण्याचा प्रयत्न करा.
स्टेप ५: दरम्यान, शक्य तितक्या मागे हात हलवा.
स्टेप ६: या स्थितीत २०-३० सेकंद रहा.
स्टेप ७: आता पुन्हा सामान्य स्थितीत परत या.
० सुरुवातीला हे आसन ४- ५ वेळा करा. पुढे क्षमतेनुसार अधिक वेळा करा.

अंजनेयासन करण्याचे फायदे

१) तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी अंजनेयासन फायदेशीर योगासन आहे. शरीर सुडोल राहण्यास या आसनाची मदत होते.

२) दररोज अंजनेयासनाचा सराव केल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते.

३) अंजनेयासनाचा नियमित सराव केल्याने फुफ्फुस मजबूत होऊन छातीभोवतीचे स्नायू सक्रिय होतात.

४) शारीरिक थकवा दूर करण्यासाठी आणि लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी या आसनाचा सराव फायदेशीर आहे.

५) अंजनेयासनाचा सराव पोट आणि कंबरेच्या स्नायूंना बळकट करतो.

० अंजनेयासनाचा सराव करताना कोणती काळजी घ्यावी?

अंजनायासनाचा सराव करताना नेहमी रिकाम्या पोटी असाल याची काळजी घ्या. याशिवाय जर तुमच्या पाठीत, पोटात वा पायांमध्ये समस्या असेल तर या आसनाचा सराव करू नका. याशिवाय कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असाल वा उपचार घेत असाल तर हे आसन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तज्ञांच्या सल्ल्यानुसार उच्च रक्तदाब, हृदयविकार, गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या रुग्णांनी हे असं करू नये.