Precautionary Dose Of Covid Vaccine तुमचं वय 18 पूर्ण असेल तर, तुम्हीही घेऊ शकता प्रीकॉशनरी डोस.. कधीपासून..?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोरोना महामारी आता हळूहळू कमी होताना दिसत असल्यामुळे सगळेच निर्धास्त झाले आहेत. पण प्रीकॉशनरी डोस घेतला नाही तर कसं चालेल? गेल्या अनेक दिवसांपासून या लसीची केवळ चर्चा होती. पण आता कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे जर तुमचे वय १८ पेक्षा जास्त असेल आणि कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील तर तुम्हाला प्रीकॉशनरी डोस (Precautionary Dose Of Covid Vaccine) घेता येणार आहे. ते हि उद्यापासून. होय. देशात उद्यापासून खासगी लसीकरण केंद्रावर हा डोस घेता येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सगळ्यात महत्वाची बाब अशी कि, कोरोना लसीचे दोन्ही डोस झाल्यानंतर ९ महिने पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच हा प्रीकॉशनरी डोस Precautionary Dose घेता येणार आहे. सध्या सरकारी लसीकरण केंद्रांवर सुरु असलेले लसीकरण आहे त्या स्थितीत सुरु राहील.
सोबतच सरकारी लसीकरण केंद्रावरदेखील कोविड प्रतिबंधक लसीचा प्रीकॉशनरी डोस सरकारच्या नियमांप्रमाणे मर्यादित लोकांना मोफत देण्यात येईल. सध्या देशात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रीकॉशनरी डोस दिला जात आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांनाही कोरोना लसीचा प्रीकॉशनरी डोस दिला जातोय.