Garlic Helps Sleep
| | |

रात्री झोपण्याआधी उशाखाली लसूण ठेवा आणि मिळवा चमत्कारिक लाभ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आहारात लसणाच्या फोडणीचा पदार्थ अतिशय खमंग आणि चविष्ट लागतो. लागतो ना..? म्हणून तर अनेक घरांमध्ये लसणीशिवाय डाळ आणि भाज्या होतच नाहीत. लसूण नाही तर फोडणी कसली..? लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते यात नक्कीच काही वाद नाही. याशिवाय १ चमचा लसणाची पेस्ट ग्रेव्हीच्या भाज्यांना लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. पण मित्रांनो हे झालं जेवणाचं.. याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहेत जे अनेकांना अजूनही माहित नाहीत. अगदी आयुर्वेदात देखील लसणीचे महत्व सांगितले आहे. पण आपल्याला जेवणाशिवाय लसूण आणखी आयुष्यात किती महत्वाची आहे हेच माहित नाही. त्यामुळे तिचे अन्य फायदे आपल्याला माहित नसतात.

Garlic

तुम्हाला माहित आहे का? लसूण अतिशय गुणकारी औषधांपैकी एक आहे. त्यामुळे आयुर्वेदातही लसणीचे एक विशेष स्थान आहे. याशिवाय रात्री झोपण्याआधी जर उशीखाली लसूण ठेवून झोपलात तर आश्चर्यचकीत व्हाल इतके फायदे आहेत. तेच फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

रात्री झोपण्याआधी उशाखाली लसूण ठेवण्याचे फायदे

1. लसूण नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा निर्माण करते. यामुळे अगदी जुन्या काळापासून लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

2. लसूण रोगप्रतिकाराक शक्ती वाढविण्यासाठी सहाय्यक आहे. कारण लसणीतील अँटी बॅक्टरीयल गुणधर्म ऍक्टिव्ह असतात. ज्यामुळे पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्यात ठेवला जायचा. यामुळे हवेतील रोगजंतू नाहीसे होऊन होतो.

3. लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यासाठी निश्चितच उपयोग होतो. 

4. लसणीमध्ये अ‍ॅलिसिन नामक एक औषधी तत्त्व असते. याच्या सहाय्याने बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू दूर राहतात आणि बाधा झाल्यास बरे होण्यास मदत होते.

5. लसूण उष्ण व तीष्ण गुणात्मक आहे. त्यामुळे लसणीच्या नुसत्या वासानेदेखील वात व कफ दूर होतो. त्यामुळे रात्री उशाखाली लसूण ठेवणे लाभदायक आहे.  

6. लसणीमध्ये समाविष्ट असलेले पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. हृदयाची स्पंदनेही नियंत्रित ठेवण्यासाठी या पोटॅशियमचा उपयोग होतो. 

7. लसणीच्या नुसत्या वासानेही कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर मात करता करता येते.

8. लसूण हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी सहाय्य करते.

9. इंसोमेनियाच्या त्रासाने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हा उपाय सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो. कारण लसूण डोक्याखाली ठेवून झोपल्याने लसणाचा उबदारपणा आणि गंध हे गुणधर्म मेंदूच्या नसा शांत करतात. शिवाय मेंदूचे कार्य सुस्थिर करून त्यांना कार्य उत्तेजन देतात. यामुळे निद्रानाशाचा उपचार होतो.