|

कच्ची केळी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जसा आहार तसे आरोग्य. हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक फळांचा समावेश करत असतो. यापैकी एक फळ म्हणजे केळी. केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण यामध्ये बरेच पोषक घटक समाविष्ट आहेत. केळी हे जगभरात खाल्ले जाणारे लोकप्रिय फळ आहे. मात्र आपण जास्त करून पिवळ्या रंगाची केळी खातो. पण तुम्हाला माहित आहे का? पिवळ्या केळ्यांपेक्षा हिरव्या रंगाची केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिरव्या केळीत फार कमी कॅलरी असतात, त्यामुळे हि केली वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊयात कच्ची हिरवी केळी आपल्या आरोग्यासाठी कशी लाभदायक असतात.

१) भुक नियंत्रणात राहते – कच्च्या केळ्यांमध्ये फायबर आणि इतर पोषण देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे कच्च्या केळीचे सेवन केल्यास भुकेवर ताबा मिळवता येतो. शिवाय कच्ची केळी खाल्ल्यामुळे अति लागणारी भूक नियंत्रणात येते आणि जंकफूड खाण्यावरून वासना उडते.

२) वजन कमी करते – वजन कमी करण्यासाठी रोज १ हिरवे कच्चे केळे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. केळ्यामध्ये असलेल्या फायबर्समुळे शरीरातील अनावश्यक फॅट सेल्स काढून टाकायला मदत होते. शिवाय शरीरात जमा होणारे अनावश्यक मेद घटू लागते. परिणामी वजन नियंत्रणात येते.

३) पचन प्रक्रियेत सुधार – कच्ची केळी खाल्ल्यामुळे पचन प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते. कच्च्या केळ्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. शिवाय या केळ्यातील कॅल्शिअममुळे हाडेदेखील मजबूत होतात.

४) बद्धकोष्ठतेवर परिणामी – कच्च्या केळ्यामध्ये फायबर आणि स्टार्च असते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

५) मधुमेहावर नियंत्रण – तुमचा डायबिटीस प्राथमिक स्टेजमध्ये असेल तर कच्ची केळी खायला सुरुवात करा. कारण कच्च्या केळ्यामध्ये मधुमेहावर नियंत्रण करणारे घटक समाविष्ट असतात.