केसांच्या आणि त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी तांदळाचे पाणी बहुगुणकारी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात भाताचा समावेश हा असतोच. फार कमी लोक भातासाठी पर्याय पसंत करतात. भात हा तांदळापासून तयार होतो हे आपण सारेच जाणतो. आता तांदळाबद्दल विशेष सांगायचे म्हणजे ज्याप्रमाणे भात खाल्ल्याने आपल्या शरीराची गरज भागते. अगदी तसेच आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठीदेखील तांदूळ सक्षम आहे. यासाठी आपल्याला फायदेशीर ठरते ते तांदळाचे पाणी. होय. कारण तांदळाचे पाणी कार्बोहायड्रेट्सचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. यामुळे आपल्या केसांपासून अगदी त्वचेपर्यंत तांदळाचे पाणी अत्यंत लाभकारी ठरते. चला तर जाणून घेऊयात तांदळाच्या पाण्याचे बहुगुणकारी लाभ खालीलप्रमाणे:-
० केसांच्या निरोगी आरोग्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर कसे?
– केसांच्या आरोग्यासाठी तांदळाचे पाणी खूप चांगले मानले जाते. याचे कारण म्हणजे, तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. हेच अँटिऑक्सिडंट्स केसांच्या वाढीसाठी खूप मदत करतात. तांदळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स सोबत इनोसिटॉल नावाचा घटक आढळतो. याशिवाय तांदळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी असे अनेक घटकदेखील आढळतात. म्हणून जर का तुम्ही तांदळाच्या पाण्याने अगदी आठवडाभर केस धुवाल तर तुम्हाला लगेच केसांमध्ये फरक जाणवेल. यामुळे केस निरोगी होतातच. शिवाय केस मुळापासून मजबूत होतात. याशिवाय केसांना फाटे फुटण्याची समस्या आणि विशेष म्हणजे केसांत कोंडा होत असेल तर तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यास या समस्या चुटकीत गायब होतात.
० त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर कसे?
– तांदळाच्या पाण्यामुळे अकाली म्हातारपण अर्थात वृद्धत्वाची समस्या दूर होण्यास मदत होते. याचे कारण असे कि, तांदळाच्या पाण्यात अमिनो ऍसिड, अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असतात. याशिवाय तांदळाचे पाणी त्वचेच्या समस्यांवर ‘अँटी एजिंग’ म्हणून काम करते. त्यामुळे रिकाम्या पोटी तांदळाचे पाणी प्यायले असता अँटी एजिंगची समस्या दूर होते. तसेच चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या, खड्डे आणि पिंपल्सची समस्या त्रास देत असेल तर किमान आठवडाभर दररोज तांदळाचे पाणी पिणे फायदेशीर आहे.