Satu Pith Benefits : ‘या’ पिठाचे सेवन कराल तर 70% गरमीचे त्रास राहतील दूर; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Satu Pith Benefits कडक उन्हाळ्यात आपल्या संपूर्ण शरीराची एकतर लाही लाही होत असते. त्यात टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती त्यामुळे आहारात विशेष बदल करून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात चुकूनही स्वभावाने उष्ण आणि चटपटीत तसेच मसालेदार पदार्थ खाण्याची चूक करू नका. नाहीतर हाय…हुई करून जीव नकोसा होईल.
उन्हाचा तडाखा पाहता अनेकांचा कल हा थंडगार सरबताकडे असतो. अगदी लिंबू पासून लिचीपर्यंत सर्व प्रकारची सरबतं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जो तो आवडीने पितो. पण अति उष्ण जितके वाईट तितकेच अति थंड देखील आरोग्यासाठी वाईटच.. मग अशावेळी कडक उन्हाच्या प्रभावापासून शरीर सुरक्षित ठेवायचे असेल तर काय खायचे..? असा सवाल समोर उपस्थित होणे फार साहजिक आहे. पण याच उत्तरही तितकंच सोप्प आहे. हेच उत्तर घेऊन आज आम्ही आलो आहोत.
उन्हाळ्यात आहाराची काळजी घेताना शरीराला आरामदायी वाटतील असे पदार्थ खाणे आवश्यक असते. तर अशा दिवसात सातूचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. कारण सातूच्या पिठातील विशेष गूण हे उष्माघात होण्याची शक्यता कमी करते. कारण सातूचे सेवन केल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. शिवाय सातूचे सेवन केल्याने उष्णतेपासून शरीराचे रक्षण होते आणि आंतरक्रिया सुरळीत राहतात. (Satu Pith Benefits)
सातू खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकवली जाते आणि अशक्तपणा दूर होतो. तसेच सातूच्या पिठातून मिळणारे पोषण हे शरीरासाठी फायदेशीर भूमिका निभावते. तर आज आपण सातूचे पौष्टिक पीठ कसे तयार करायचे..? त्याचा वापर कसा करायचा..? त्यात कोणते पौष्टिक गुणधर्म आहेत..? आणि त्यामुळे शरीराला काय काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.
सातूचे पीठ असे बनवा (Satu Pith Benefits)
० साहित्य – अर्धा किलो गहू, अर्धा किलो डाळवं, अर्धा चमचा सुंठ पूड, पाव चमचा वेलची पावडर.
० कृती – सातूचे पीठ बनवताना सर्वात आधी गहू धूऊन १५ मिनिटं भिजवून ठेवा. यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर काढून निथळा. आता जरासे ओलसर असतानाच त्याला खलबत्यात हलक्या हाताने कांडून घ्या. यानंतर फोलपट काढलेले गहू पूर्णपणे वाळवा. आता वाळलेले गहू मंद आचेवर खमंग भाजा आणि यात डाळवं घालून दळून आणा. मस्त तयार पिठात सुंठपूड आणि वेलचीची पूड मिसळा आणि एका कोरड्या बरणीत भरून ठेवा. (Satu Pith Benefits)
० वापर – बरणीत साठवलेल्या सातूच्या पिठात आवडीनुसार गूळ, दूध आणि पाणी घाला. हे मिश्रण व्यवस्थित घोटून घट्ट खिरीसारखे बनवून प्या. उन्हाळ्यामध्ये शरीराचे तापमान वाढलेले असताना सतत तहान लागल्यास कितीही पाणी प्यायले तरी तहान शमल्याचे समाधान मिळत नाही. अशावेळी सत्तू पाण्यात कालवून त्याचे सरबत प्या. हे तयार करण्यासाठी २ लहान चमचे सातूचे पीठ घेऊन त्यामध्ये १ १/२ कप थंड पाणी घाला आणि चवीनुसार मीठ, जिर पूड घालून हे सरबत प्या.
० सातूच्या पिठात कोणते पोषक गुणधर्म असतात..?
सातूच्या पिठात सर्व पोषक तत्वे समाविष्ट असतात. यात प्रामुख्याने प्रथिने, कॅल्शियम, फायबर, लोह, मँगनीझ आणि मॅग्नेशिमची मात्रा भरपूर प्रमाणात असते. साधारण १०० ग्रॅम सत्तूच्या पिठात २०.६ टक्के प्रथिने, ७.२ टक्के फॅट, १.३५ टक्के फायबर आणि एकूण ४०६ कॅलरीज असतात.
० सातूच्या पिठाचे फायदे (Satu Pith Benefits)
१) सातूचे सेवन करताना त्यात चिमूटभर मीठ आणि लिंबू मिसळून रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. याचा फायदा उन्हाळ्यात होतो. शरीरातील उष्णता कमी झाल्यामुळे गरमीचे त्रास होत नाहीत. शिवाय पोटालाही आराम मिळतो.
२) सातूच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी शरीरात ऊर्जा कायम राहते. शिवाय शरीरातील रक्ताची कमतरता जाणवत नाही. (Satu Pith Benefits)
३) सातू हे पचनशक्ती- वर्धक आहे. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आढळत असल्यामुळे ते अपचन, अॅसिडीटी आणि गरमीमुळे ओटाशी संबंधित होणाऱ्या समस्या दूर करतात.
४) सातू हे Low Glycemic Index असलेले खाद्य आहे. यामुळे सत्तूचे थंड सरबत प्यायल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच कोलेस्टेरोल जास्त असणाऱ्यांनी सुद्धा सत्तूचे सेवन केल्यास फायदा होतो.
५) सातूच्या पिठाचा वापर करून तयार केलेला फेस पॅक लावल्याने त्वचेला आर्द्रता मिळून त्वचा चमकदार आणि नितळ होते. तसेच उन्हामुळे होणारे टॅनिंग कमी करण्यासाठी देखील सातूच्या पिठाचा वापर केला जाऊ शकतो. (Satu Pith Benefits)
६) केसांच्या आरोग्यासाठी देखील सातू फायदेशीर आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसात केसांमध्ये घाम जास्त असल्याचे धूळ आणि माती चिकटून राहते. यामुळे स्कॅल्पचे नुकसान होते आणि परिणामी केसांचेही नुकसान होते. दरम्यान सातूमधील पोषक द्रव्ये केसांच्या मुळांना मजबूत बनवून केसगळती थांबवतात.