Apple
|

ताजे आणि चमकदार सफरचंद आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सफरचंद हे सर्व फळांपैकी अत्यंत आरोग्यदायी फळ म्हणून ओळखले जाते. अगदी डॉक्टर आणि आहार तज्ञ देखील आपल्या दैनंदिन जीवनात किमान एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे सफरचंदातील पोषक तत्त्वे. साधारण १०० ग्रॅम सफरचंदात ५२ कॅलरी, ०.३ ग्रॅम प्रथिने, १३.८ ग्रॅम कार्ब, १०.४ ग्रॅम साखर, २.४ ग्रॅम फायबर, ०.२ ग्रॅम फॅट आणि ८६% पाणी असते. (Side Effects of Eating Apple)

त्यामुळे बाजारात गेल्यानंतर डोळ्यासमोर सफरचंद असेल तर साहजिकच ते खरेदी करण्याचा मोह होतो. पण तुम्हाला माहित आहे का..? बाजारात तुमचं लक्ष वेधून घेणारे हे चमकदार सफरचंद तुमच्या आरोग्यासाठी विषापेक्षाही घातक ठरू शकतं. तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, ताजे आणि चमकदार दिसणारे सफरचंद गंभीर आजारांना आमंत्रण देतात. परिणामी आरोग्यविषयक तक्रारी वाढू लागतात.

चमकदार सफरचंद आरोग्यासाठी घातक ठरण्याचे कारण

तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, स्टोअर हाऊसमध्ये साठवून ठेवलेल्या सफरचंदांमध्ये १३% कॅन्डिडा ऑरिस हा घटक जमा होतो. सफरचंदांच्या पृष्ठभागावर वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या प्रभावामुळे हा घटक जमा होतो.

हा घटक अतिशय विषारी आणि शरीरासाठी हानिकारक असतो. म्हणूनच चमकदार आणि ताजे दिसणारे प्रत्येक सफरचंद आरोग्यदायी असू शकत नाही. जर त्यावर कॅन्डिडा ऑरिसचा प्रभाव असेल तर आरोग्याचे नुकसान होणार हे नक्की आहे. (Side Effects of Eating Apple)

० ‘कॅन्डिडा ऑरिस’ म्हणजे काय?

कॅन्डिडा ऑरिस (Candida Auris) हा एक बुरशीचा एक प्रकार आहे. जो सफरचंदाच्या पृष्ठभागावर बुरशीप्रमाणे पसरतो. त्यामुळे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. संशोधनानुसार, फळबागांमधून आणलेल्या सफरचंदांमध्ये कॅन्डिडा ऑरिसचा कोणताही प्रभाव नसतो.

मात्र बाजारातून घेतलेल्या सफरचंदांवर कालांतराने कॅन्डिडा ऑरिस विकसित होतो. याचे कारण म्हणजे हे फळ रसायनांची फवारणी करून शेल्फ लाइफ वाढविलेले असते. या रसायनांचा दीर्घकाळ वापर कॅन्डिडा ऑरिस विकसित करतो.

० मृत्यूचा धोका असण्याची शक्यता

रोग नियंत्रण आणि प्रतिबंधानुसार, कॅन्डिडा ऑरिस (Candida Auris) हा रोग- कारक बुरशीच्या यादीत असल्यामुळे शरीराला विविध प्रकारच्या रोगांचे संक्रमण होऊ शकते. यामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे सहज ओळखता येत नाहीत. कारण ते आधीपासून आजारी असलेल्या लोकांना संक्रमित करते. तसेच हा बुरशीजन्य घटक शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करेल हे लक्षणे आणि संक्रमणावर आधारित आहे. (Side Effects of Eating Apple)

रिपोर्टनुसार, त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप आणि थंडीचा समावेश आहे. या घटकाचे संक्रमण वेळीच लक्षात न आल्यास ते संपूर्ण शरीरात किंवा रक्तामध्ये पसरते. परिणामी गंभीर आजारांची होण्याची शक्यता असते आणि याच्या हाय केसेसमध्ये मृत्यूचीही शक्यता आहे.