आहारात मिठाचे असलेले दुष्परिणाम
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आहारात जर मीठ बिलकुल नसेल तर त्यावेळी आपल्या आहारातील भाज्यांना चव अजिबात लागत नाहीत. त्यामुळे कोणतेच पदार्थ सहजासहजी खाल्ले जात नाही. त्यामुळे भूक असली तरी आपल्या आहारात बेचव पदार्थांचा आहारात समावेश करावा वाटत नाही. अश्या वेळी आपण आपल्या आहारात थोड्या तरी मिठाचा समावेश हा करावासा लागतोच . पण आहारात जर जास्त मीठ झाले तर अश्या वेळी आपल्या आरोग्यास कोणत्या प्रकारचे नुकसान होऊ शकते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ….
आहारात मिठाचे प्रमाण जास्त असेल तर अश्या वेळी हाय बीपी चा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. मिठामध्ये आयोडीन चे प्रमाण हे जास्त असेल तरी ते आरोग्यास धोकादायक असू शकते . त्यामुळे आयोडीनचे योग्य प्रमाणात समावेश असलेले मीठ च आहारात वापरावा . जर जास्त प्रमाणात मीठ खाण्याची सवय असेल तर मात्र ते शरीरासाठी धोकादायक असू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार आपल्या आहारात ५ ग्रॅम पेक्षा पण कमी मिठाचा वापर आहारात केला जावा . जास्त खारट पदार्थ असतील तर त्यावर मिठाचा वापर हा जास्त प्रमाणात केला या जाऊ नये. ज्या लोकांना मधुमेह आणि जास्त रक्तदाबाचा त्रास आहे , त्या लोकांनी आपल्या आहारात मिठाचा वापर हा केला जाऊ नये.