कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या..?आता फिकीर नॉट; जाणून घ्या सोप्पे आणि घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सौन्दर्य हि देवाची अशी देणगी आहे जी प्रत्येकालाच हवीहवीशी असते. एका ठराविक वयामध्ये त्वचेची चमक आणि तेज इतके प्रखर असते कि आयुष्यभर स्वतःला न्याहाळावे वाटते. आजकालच्या तरुणाईत विशेषतः सौन्दर्याबाबत अतिशय काळजी घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. प्रत्येकाला आपला चेहरा हा इतरांपेक्षा सुंदर आणि चमकदार हवा असतो. यासाठी बऱ्याचवेळा केमिकलयुक्त क्रीम्स आणि अन्य प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. यामुळे अनेकदा कमी वयातच चेहरा खडबडीत, डागाळलेला आणि सुरकुतलेला दिसू लागतो.
खरतर आपल्या शरीराच्या भागांपैकी त्वचा अत्याधिक संवेदनशील असते. यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर ठेवणे गरजेचे आहे. याचे कारण असे कि नैसर्गिक पदार्थ हे केमिकल विरहित असतात. ज्यामुळे त्वचेला होणाऱ्या हानीची संभवता समूळ नाहीशी होते. इतकेच नव्हे तर अनेक नैसर्गिक पदार्थ जे सौन्दर्य टिकवण्यासाठी उपयोगी असतात ते आपल्या घरात दैनंदिन वापरात असतात. मुख्य म्हणजे घरगुती उपचारांसाठी खूप पैसे आणि विशेष वेळ दोन्ही फारसे लागत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नैसर्गिकरित्या आपली त्वचा कशी सुंदर राखता येईल, यासाठी काही खास गोष्टी सांगणार आहोत. याकरिता तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागणार आहे.
तर दोस्तहो, आपल्या त्वचेसाठी आंबे हळद आणि चंदन या दोन्हीही गोष्टी अत्यंत फायदेशीर आहेत. मुख्य म्हणजे हे दोन्ही जिन्नस तुम्हाला तुमच्या आज्जीच्या बटव्यात सहज सापडतील. जर तुमच्या घरात पारंपरिक सहान असेल तर तुम्ही आंबे हळद आणि चंदन उगाळून त्याचा पातळ असा लेप तयार करू शकता. हा लेप आठवड्यातून किमान ३ वेळा १० ते १५ मिनिटांसाठी लावला असता चेहऱ्यावरील काळे डाग थोडथोडक्या मात्रेने कमी होऊ लागतात. आजकाल बऱ्याच लोकांकडे सहान असण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे सहान नसेल तरीही काळजी करण्याचे कारण नाही. अन्य कोणत्याही वस्तू वा यंत्राच्या सहाय्याने तुम्ही हळद आणि चंदनाची बारीक पावडर करून घेऊ शकता. यात गरजेनुसार गुलाब जल वा शुद्ध पाण्याचा वापर करून त्याचा लेप तुम्ही तयार करू शकता. हा लेप तयार करण्याचे निश्चित असे प्रमाण नसले तरी ढोबळमानाने १ चमचा हळद आणि १.५ चमचा चंदन असे दोहोंचे प्रमाण घ्यावे.
आपल्या घरात भाकऱ्या करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा सर्रास उपयोग होतो. मात्र या पिठाचा वापर त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठीही होऊ शकतो याचा कधी कुणी विचार केला आहे का..? खरंतर तांदळाचे पीठदेखील त्वचेकरीत अत्यंत फायदेशीर असते. तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच वापरला जातो असे बिलकुल नाही, तर त्वचेबाबत उदभवणाऱ्या अनेक समस्यांवरील उपचारांसाठीही त्याचा वापर केला जातो. भिजवलेलया तांदळाची पेस्ट किंवा तांदळाच्या पिठाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या वेगाने कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि साधारण दाट पेस्ट होण्याइतपत गुलाब पाण्याचे मिश्रण तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर एखाद्या स्क्रबप्रमाणे त्वचेला हानी न करता लावा आणि ती सुकल्यानंतर अगदी १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. याने चेहऱ्यावरील धूळ आणि मळ देखील काही क्षणात निघून जातो आणि चेहरा टवटवीत दिसू लागतो.
या व्यतिरिक्त चेहऱ्यासाठी ग्रीन टी अर्थात गवती चहा आणि हिरवा लिंबू देखील अत्यंत उपयोगी आहे. जर आपली त्वचा तेलकट असेल आणि आपल्याला खूप घाम येत असेल ज्यामुळे अनेकदा चेहरा कोमेजल्या सारखा दिसू लागतो तर हा उपाय नक्की तुमच्या कमी येईल. २ चमचे तांदळाच्या जाड पिठीत एक चमचा ग्रीन टी आणि एक लहान चमचा लिंबाचा रस घ्या. हे मिश्रण एकाच बाजूने फिरवून मिश्रित करून घ्या. यानंतर तयार झालेला लेप आपल्या चेहऱ्यावर किमान १५ ते २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. यामुळे चेहऱ्यावरील खड्डे, मुरुम आणि काळ्या डागांच्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि घामाचे प्रमाण कमी होऊन त्वचा चमकदार होते.